राज्यातील विविध भागांत आलेल्या नैसर्गिक आपत्ती, तांत्रिक अडचणी आणि वाहतूक व्यवस्थेतील अडथळे यामुळे अनेक लाभार्थींना “माझी लाडकी बहीण” योजनेसाठी आवश्यक असलेली e-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही. या परिस्थितीची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री यांनी e-KYC प्रक्रियेस 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे.
सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, अद्याप e-KYC न केलेल्या सर्व लाभार्थींना ही संधी मिळत असून, योजनेचा लाभ अखंडितपणे मिळावा यासाठी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य सरकारने स्पष्ट केले की, ही मुदतवाढ ही लाभार्थी बहिणींना दिलासा देण्यासाठी करण्यात आलेली असून, कोणत्याही अडचणीशिवाय योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
देशातील कामगारांना अधिक पारदर्शक व सुरक्षित सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन लेबर कायद्यात मोठ्या बदलांची घोषणा करण्यात आली आहे. ग्रॅच्युइटीपासून ते किमान वेतनापर्यंत, अनेक नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली असून त्याचा थेट फायदा कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होणार आहे.
➧ ग्रॅच्युइटी नियमांमध्ये मोठा बदल. नवीन तरतुदीनुसार ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी आता पाच वर्षांची सलग सेवा अनिवार्य राहिलेली नाही. कोणत्याही संस्थेमध्ये फक्त एक वर्ष सेवा पूर्ण केल्यावरही कर्मचारी ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरणार आहेत. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कार्यरत असलेले कर्मचारीही या तरतुदीचा लाभ घेऊ शकतील.
➧ कामाचे तास आणि ओव्हरटाईमबाबत कडक अंमलबजावणी. किमान वेतनासोबत ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ओव्हरटाईम करण्यासाठी जबरदस्ती करता येणार नाही. राज्य सरकार ओव्हरटाईमची कमाल मर्यादा निश्चित करेल. तसेच कामाच्या पात्रतेची अट 240 दिवसांवरून 180 दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे.
➧ नियुक्ती पत्र देणे सर्व नियोक्त्यांवर बंधनकारक. कोणत्याही कर्मचाऱ्याला नियुक्त करताना त्याला औपचारिक नियुक्तीपत्र देणे आता अनिवार्य आहे. त्यात पगार, कामाचे तास, जबाबदाऱ्या व इतर अटी स्पष्ट उल्लेखलेल्या असणे आवश्यक आहे. यामुळे कर्मचारी–नियोक्ता संबंध पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट आणि सुरक्षित होणार आहेत.
➧ वेतन वेळेत देणे आवश्यक; उशीर केल्यास दंड. सर्व क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना निश्चित तारखेत पगार देणे अत्यावश्यक आहे. पगार देण्यात उशीर केल्यास संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षितेत वाढ होणार आहे.
➧ अपघाताची व्याख्या बदलली; घर–काम प्रवासातील दुर्घटना समाविष्ट. घरातून कामाच्या ठिकाणी जाताना किंवा कामावरून घरी येताना झालेल्या अपघाताला आता रोजगार-संबंधित दुर्घटना मानले जाईल. अशा परिस्थितीत सर्व प्रकारच्या लाभांसाठी कर्मचारी पात्र ठरेल.
➧ ESI योजनेचा व्याप वाढला. दुकाने, बागायती, कृषी आणि विविध औद्योगिक क्षेत्रांतील अधिक कर्मचारी आता ESI योजनेत समाविष्ट होणार आहेत. यामुळे वैद्यकीय विमा, मातृत्व लाभ, अपंगत्व विमा यांसारख्या सुविधांचा लाभ अधिक कामगारांना मिळेल.
➧ मीडिया आणि डिजिटल कर्मचाऱ्यांसाठी औपचारिक नियुक्ती अनिवार्य. OTT प्लॅटफॉर्मवरील कर्मचारी, पत्रकार, डिजिटल संपादक आणि कंटेंट निर्मात्यांना आता नियमित नियुक्तीपत्र देणे अनिवार्य आहे. यामुळे कामाचे तास, जबाबदाऱ्या आणि वेतन संरचना स्पष्ट होईल.
➧ देशभर एकसमान किमान वेतन लागू होणार. केंद्र सरकार संपूर्ण देशासाठी राष्ट्रीय किमान वेतन दर निश्चित करणार आहे. यापेक्षा कमी वेतन कोणतेही राज्य सरकार देऊ शकणार नाही. या निर्णयामुळे सर्व क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांसाठी एकसमान पगाराची अंमलबजावणी होणार आहे.
➧ IT आणि निर्यात क्षेत्रात वेळेत वेतन देणे बंधनकारक. IT, ITES, वस्त्रोद्योग, बंदरे आणि निर्यात क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेपर्यंत देणे अनिवार्य आहे. उशीर केल्यास कंपनीवर कारवाई केली जाईल.
➧ 40 वर्षांवरील कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक मोफत आरोग्य तपासणी. चाळीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याची वर्षातून एकदा मोफत आरोग्य तपासणी कंपनीने करणे आवश्यक आहे. तपासणीचा संपूर्ण खर्च कंपनीवरच राहणार आहे.
पहा कसे करायचे लालपरी चे तिकीट घरबसल्या मोबाईल वरून आरक्षित. पहा पूर्ण माहिती.
सद्या धावपळीच्या युगात सर्वांकडे वेळ कमी आहे. बसस्थानक पर्यंत जाऊन तिथे रांगेत उभा राहून तिकीट आरक्षित करण्यात इतका वेळ नाही. एस टी महामंडळाने पण आता कात टाकली आहे. जगा सोबत बदलत एस टी महामंडळाने ही अनेक नवनवीन बदल केले आहेत जसे की ऑनलाईन तिकीट, बस ट्रेकिंग, नवनवीन अत्याधुनिक सर्व सोई युक्त बस गाड्या. अशा अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. msrtc reservation app
➧ असे करा ऑनलाईन घरबसल्या मोबाईल वरून तिकीट आरक्षित.
सर्व प्रथम आपणांस आपल्या मोबाईल मध्ये गूगल प्ले स्टोअरवर जाऊन एस टी महामंडळाचे अधिकृत ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहे. MSRTC Bus Reservation हे ॲप आहे. https://play.google.com/store/apps/details?id=com.itms_consumer.msrtc.msrtc याची लिंक ही असून ॲप डाउनलोड करून झाल्यानंतर ॲप उघडल्यास वरती डाव्या कोपऱ्यात लॉगिन बटणावर क्लिक करून लॉगिन करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती भरून लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करून लॉगिन करून घ्यावे कारण लॉगिन केल्याशिवाय तिकीट आरक्षित करता येत नाही. bus seat reservation
ॲपच्या होम पेज वर आल्यावर पासून-पर्यंत असे दोन पर्याय दिसतील त्या मध्ये गाडी शोधण्यासाठी पासून पर्यंत चे ठिकाण टाका व त्यानंतर प्रवासाचा दिनांक निवडा. नंतर बस शोधा या लाल बटणावर क्लिक करा. पुढील पेज वर त्या मार्गावरील सर्व बस दिसतील त्यातील आपल्याला ज्या बसची बुकिंग करायची आहे ती बस सलेक्ट करणे. व नंतर बसण्याचे आणि उतरण्याचे ठिकाण निवडल्या नंतर लगेच बसची आसन शमता म्हणजेच सीट नंबर चे पेज ओपन होईल. त्यामध्ये निळ्या कलरचे सीट नंबर हे बुक झालेले असतील, पिंक कलरचे सीट हे महिला साठी असतील, जांभळ्या रंगाचे सीट हे ज्येष्ठ नागरिकांसाठी असतील, लाल रंगाचे सीट हे अपंगांसाठी असतील तर पांढऱ्या रंगाचे सीट हे सामान्य प्रवाशांसाठी असतील.
रिकामे असलेल्या सीट नंबर पैकी आपणास लागतील तेवढे सीट नंबर सलेक्ट करा. व नंतर प्रवाशाची माहिती भरा जसे की नाव, लिंग, वय व प्रवाशी सवलत कोणती आहे ही सर्व माहिती भरा व त्यानंतर खाली आपला मोबाईल नंबर टाका आणि गो टू पेमेंट (Go to Payment) वर क्लिक करा. लगेच आपण भरलेली सर्व माहिती आपणासमोर ओपन होईल. ती सर्व तपासून पेमेंट करण्यासाठी पुढे जा. तिथे तुम्हाला तीन ऑप्शन मिळतील एक डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड. दुसरे युपिआय पेमेंट. व तिसरे नेट बँकिंग या पैकी एका प्रकाराने पेमेंट करा. पेमेंट पूर्ण झाल्या बरोबर लगेच आपणास आरक्षित झालेले तिकीट मिळेल. हे मिळालेले तिकीट घेऊन आपण त्या बस मध्ये प्रवास करू शकतो. हे तिकीट हे ई- तिकीट असल्या मुळे बस मध्ये प्रवास करताना वाहकाला याची हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी दाखवली तरी चालते परंतु प्रवास करताना आपल्या सोबत एक आय-डी प्रुफ असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्र लागणार? अर्ज कसा करायचा?
13 मे रोजी दहावीचा निकाल लागला आणि आता पुढे काय? हा प्रश्न सर्व विद्यार्थी आणि पालक यांना पडलेला आहे. सर्वत्र विद्यार्थी आणि पालक यांची पुढील प्रवेशासाठी लगबग पाहायला मिळत आहे. ज्या विद्यार्थ्यांना अकरावी साठी प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हि बातमी नक्कीच महत्वाची असणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अकरावी प्रवेशासाठी आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. चला तर मग पाहूया ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत.
यंदा प्रथमच अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही राज्यभरात केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील ९ हजार २९४ कनिष्ठ विद्यालयाने नोंदणी केलेली आहे. २६ मे पासून प्रवेश नोंदणी अर्ज भरण्यासाठी सुरवात होत आहे. https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र पुढे पाहुयात.
➧ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र.
दहावी उत्तीर्ण गुणपत्रिका. (SSC Pass Marksheet)
शाळा सोडल्याचा दाखला. ( School Leaving certificate)
आधार कार्ड. (Aadhar card)
पासपोर्ट आकाराचा फोटो. (Passport size photo)
अधिवास प्रमाणपत्र. (Domicile certificate)
जात प्रमाणपत्र. (Cast Certificate)
नॉन क्रिमी लेयर (Non-Creamy layer)
अपंगत्व प्रमाणपत्र. (diciblity certificate) वरीलपैकी आपणास लागू असलेले कागदपत्र/ प्रमाणपत्र तयार ठेवा.
➧ अर्ज कसा करावा?
https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन होम पेज वरचा न्यू रजिस्ट्रेशन चा पर्याय निवडा. तो पर्याय निवडल्यानंतर आपले नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी हे सर्व वैयक्तिक माहिती अचूकपणे भरा व त्यानंतर दहावीच्या परीक्षेचा सीट नंबर, उत्तीर्ण झालेले वर्ष व शिक्षण मंडळ कोणते आहे त्याची माहिती भरा. त्यानंतर पुढे विचारलेल्या अधिक प्रश्नांची माहिती अचूकपणे भरा. व त्यानंतर आपला पासवर्ड सेट करा. व नोंदणी फार्म पूर्णपणे भरा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मिळालेला लॉगिन आयडी, पासवर्ड व अर्ज क्रमांक सुरक्षितपणे जपून ठेवा. कारण पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी तो लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार दहावी आणि बारावीचा निकाल मे महिन्यामध्ये लागण्याची शक्यता? आता निकाल पाहता येणार डिजीलॉकर वरून?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकाला ( SSC HSC EXAM RESULT 2025) बाबत मंडळाने दिलेल्या माहितीनुसार मोठी अपडेट समोर येत आहे. बारावीचा निकाल हा गतवर्षी २१ मे ला लागला होता परंतु यावर्षी निकाल हा निकाल १० मे अगोदरच लागेल, त्याचप्रमाणे दहावीचा निकाल हा गतवर्षी २७ मे ला लागला होता परंतु यावर्षी हा निकाल १५ मे अगोदरच लागेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षी मंडळाने निकाल पाहण्यासाठी एक नवीन पद्धत विद्यार्थ्यांसाठी दिली आहे. डिजीलॉकर ॲप च्या माध्यमातून निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावर एकाच वेळी लाखो विद्यार्थी निकाल पाहत असतात अशा वेळेस साईटवर खूप लोड योतो व सर्वांना निकाल पाहता येत नाही. त्याकरिता मंडळ हा निकाल डिजीलॉकर ॲप वर उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.? दहावी आणि बरावीच्या दोन्ही मिळून तब्बल एकवीस लक्ष विद्यार्थांचा निकाल डिजीलॉकर ॲप च्या माध्यमातून पाहायला मिळणार असल्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीये पर्यंत होणार महिलांच्या खात्यात जमा?
सध्या महाराष्ट्र मध्ये लाडकी बहिणी योजना (Mukhyamantri Ladki Bahin Yojna) चर्चेत असून या योजनेचा दहावा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता हा आणखीन महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या नसून लाभार्थी महिला भगिनी या हप्त्याची वाट चातकासारखी पाहताना दिसून येत आहेत. खरं पाहता एप्रिल महिन्याचा हा शेवटचा आठवडा आहे. तरी देखील आणखीन लाभार्थी महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झालेले नाहीत.
एप्रिल महिन्याचा लाडक्या बहिणीचा पंधराशे रुपये हप्ता हा लवकरात लवकर म्हणजेच अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर 30 तारखेच्या अगोदर लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती महिला व बाल विकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.?
विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणी योजनेची अर्ज पडताळणी चालू केलेली असून आणखीनही चालूच आहे. या योजनेच्या निकषांनुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. जसेकी ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार पेक्षा अधिक आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच पात्र महिलांच्या खात्यावर हे पंधराशे रुपये जमा होणार आहेत.
रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी. रेशनकार्ड ई-केवायसी करण्यासाठी मिळाली मुदत वाढ. ही अंतिम मुदतवाढ असल्याचा दावा?
Ration Card KYC रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ई-केवायसी करण्यासाठी रेशन कार्ड धारकास ही शेवटची संधी असल्याचे सांगितले जात आहे? या आधी रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत ही ३१ मार्च २०२५ ही होती परंतु आता याला एक महिन्याची मुदत वाढ मिळाली असून ३० एप्रिल २०२५ पर्यंत ई-केवायसी करू शकता.
आता केलेली मुदतवाढ ही चौथ्यांदा केलेली मुदतवाढ आहे. असे विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ही शेवटची मुदतवाढ असल्याचे सांगितले जात आहे? यानंतर रेशन कार्ड केवायसी करण्याकरिता मुदतवाढ मिळणार नसून 30 एप्रिल पर्यंत सर्व रेशन कार्डधारकांनी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.
स्वतः उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले!
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. (mukhyamantri ladki bahin yojna February 2025) फेब्रुवारी महिन्याचा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा हप्ता अद्याप पर्यंत महिलांच्या खात्यावर जमा झालेला नाही. सर्व लाभार्थी महिलांना आनंदाची बातमी आज स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
आज जालना जिल्ह्यातील परतूर येतील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलताना म्हणाले की, महिला व बालविकास खात हे आमच्या आदिती तटकरे यांच्या कडे आहे. त्यांनी या योजने मध्ये खास लक्ष घातले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली तेव्हापासून या योजने मुळे आमच्यावर भरपूर टीका झाली. आज हेच मीडिया वाले सांगतात की ही योजना बंद होणार?. परंतू आम्ही शब्दाचे पक्के आहोत. आम्ही दिलेला शब्द पाळतो. ही योजना बंद होणार नाही. कालच मी या योजनेसाठी लागणाऱ्या रकमेसाठी मंजुरी दिली आहे. आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा पंधराशे रुपये हप्ता हा आठ दिवसामध्ये सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे असे सांगितले.
पहा काय कागदपत्र लागतात, काय आहे पात्रता, काय आहेत नियम व अटी. Anganwadi Sevika Recruitment 2025
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यान साठी एक आनंदाची बातमी. महिला व बाल विकास विभागा अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या दोन्ही मिळून १८ हजार ८८२ पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविका ५६३९ तर मदतनीस १३२४३ पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती प्रक्रिया मोठी भरती प्रक्रिया असणार आहे. यामध्ये लाखोंच्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार ७५ हजार पद भरती करणार आहे त्यापैकी अठराहजार पदभरती ही महिला व बालविकास विभाग करीत आहे असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
भरती प्रक्रिया ही संपूर्ण पारदर्शक पद्धतीने होणार असून उमेदवारांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडण्याचे आवाहन हे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. राज्यातील अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी वेगवेगळ्या जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर तशा प्रकारच्या जाहिराती काढण्यात आल्या आहेत. १४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२५ या कालावधीत मुख्य सेविका या पदाची सरळ सेवा व निवडीद्वारे ३७४ पदभरतीची परीक्षा होणार आहे. या पद भरतीसाठी लागणारी कागदपत्रे, पात्रता, नियम व अटी आपण खाली पाहणार आहोत.
अर्जा सोबत जोडावी लागणारी कागदपत्रे.
• लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
• आधार कार्ड
• रहिवासी प्रमाणपत्र तहसील कार्यालयाचे (अनिवार्य)
• सक्षम प्राधिकारी यांचे विधवा प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
• सक्षम प्राधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
• शैक्षणिक अहर्ता/ पात्रता प्रमाणपत्र, गुणपत्रके.
• अंगणवाडी सेविका/मदतनीस यांची किमान आर्हता १२ वी (HSC) उत्तीर्ण आवश्यक आहे उमेदवार पदवी/पदव्युत्तर इत्यादी बाबतचे गुणपत्रक व प्रमाणपत्र यांच्या सत्य प्रति जोडणे.
• शासकीय / अनुदानित संस्थेत दाखल असलेल्या अनाथ अर्जदाराचे बाबतीत सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र. (लागू असल्यास)
• डी.एड. पदविका, बी.एड. पदविका असल्यास त्याचे गुणपत्रक व प्रमाणपत्रक जोडणे.
• उमेदवार MS-CIT उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र जोडणे.
• अंगणवाडी सेविका/अंणवाडी मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका म्हणुन कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र. (लागु असल्यास)
• अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे स्वतः साक्षांकित (Self Attested) केलेली असणे आवश्यक आहे.
अधिकची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील अधिकृत संकेत स्थळावर जा.
RTE ADMISSION EXTENSION सन २०२५-२०२६ शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासवर्ग घटकाकरिता २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही दिनांक १४ जानेवारी २०२५ पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती तर २७ जानेवारी २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. परंतु त्यास आज मुदतवाढ मिळाली आहे.
२५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही दिनांक १४ जानेवारी २०२५ पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती तर २७ जानेवारी २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. परंतु आज त्यास मुदतवाढ मिळाली असून दिनांक ०२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. तरी पालकांना अर्ज भरण्यास आणखीन सहा दिवस अवधी मिळाला आहे.
आज RTE पोर्टलवर दिसत असलेल्या आकडेवारी नुसार ८ हजार ८६३ शाळांची नोंदणी झाली असून १ लाख ९ हजार १११ जागा उपलब्ध आहेत. पोर्टल वरील सूची नुसार आज पर्यंत २ लाख ५९ हजार २९३ अर्ज दाखल झालेले आहेत. व मुदतवाढ मिळाल्यामुळे आणखीन अर्ज दाखल होणार आहेत.