EPFO धारकांसाठी खुशखबर! तुमचे PF चे पैसे मिळणार आता लवकरात लवकर?

EPFO ऑटो क्लेम सेटलमेंट सेवे मुळे दावे लवकर निकाली निघणार! मर्यादा ५०,०००/- रुपयां वरून १,००,०००/- केल्याची माहिती?

PF

EPFO धारकांसाठी खुशखबर! तुमचे PF चे पैसे मिळणार आता लवकरात लवकर? EPFO extends auto claim settlement facility

EPFO ची स्थापना ही १९५२ मध्ये झालेली असून सुरवातीला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यांचा लाभ दिला जात होता परंतु आता खाजगी कर्मचाऱ्यांना देखील याचा लाभ मिळत आहे. बदलत्या काळाच्या ओघांमध्ये ईपीएफओ ने नवनवीन योजना आणून त्यात दिवसेंदिवस बरेच बदल केलेले आहेत. EPF योजनेमध्ये कर्मचारी आणि कंपन्यांकडून दर महिन्याला PF फंडात जे योगदान दिले जाते त्यावर वार्षिक आधारावर सरकारकडून व्याज दिले जाते. सेवानिवृत्ती नंतर कर्मचाऱ्याला मोठा निधी व मासिक पेन्शनचा लाभ दिला जातो.

EPFO कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या लाखो सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता EPFO ने आपल्या सदस्यांसाठी ऑटो क्लेम सेटलमेंट ही नवीन सुविधा दिली आहे व तिची व्याप्ती वाढवली आहे. म्हणजे आता लग्न, घर बांधणे, रोगावरील उपचार, आपल्या सर्वांवरील दावे लवकर निकाली काढली जाणार आहेत. आता EPFO ने ऑटो क्लेम सेटलमेंट ची मर्यादा ५०,०००/- रुपयां वरून १,००,०००/- केल्याची माहिती दिली आहे

EPFO ने ऑटो क्लेम सोल्यूशन सुरू केले आहे यामध्ये IT (तंत्रज्ञान) प्रणालीद्वारे दावे निकाली काढले जानार आहेत. आजारावरील उपचारांसाठी ॲडव्हान्स क्लेम सेटलमेंटसाठी ऑटो मोड सुविधा ही एप्रिल २०२० पासूनच सुरू केली गेली आहे. मागील आर्थिक वर्षात त्यांनी साडेचार कोटी दावे निकाली काढली आहेत. यातील ६०% अधिक दावे हे आगाऊ दावे होते.

ऑटो क्लेम सेटलमेंट प्रणाली मध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप राहणार नसून यापूर्वी दावे निकाल काढण्यासाठी जास्त वेळ लागत होता तो लागणार नसून आता लवकरात लवकर दावे निकाली लागणार आहेत. यामध्ये केवायसी, पात्रता व बँक प्रमाणीकरण ही प्रक्रिया आपोआप केले जाणार आहे. त्यामुळे दावे निकली काढण्यासाठी दहा ते पंधरा दिवस लागत होतं ते आता तीन ते चार दिवसात होणार आहे.

जर कोणत्याही दाव्याचे निराकरण IT प्रणालीद्वारे केले गेले नाही तर ते नाकारले किंवा परत केले जाणार नाही. याउलट IT प्रणालीद्वारे दावा निकाली काढला नाही तर दुसऱ्या स्तरावरील छाननी आणि मंजुरीद्वारे निकाली काढला जाईल. अशा स्थितीत, EPFO च्या ऑटो क्लेम केल्यानंतर आता घर, लग्न किंवा शिक्षणासाठी केलेले दावे कमी वेळेत निकाली काढले जातील जेणेकरून EPFO धारकांसाठी लवकरात लवकर निधी मिळू शकेल.

.

click here
1693414770721

PM Vishwakarma Yojna उद्योगासाठी एक ते तीन लाखापर्यंत मिळेल कर्ज! पहा कोणती आहे योजना!

vishwakarma

PM Vishwakarma Yojna उद्योगासाठी एक ते तीन लाखापर्यंत मिळेल कर्ज! पहा कोणती आहे योजना!

आज प्रत्येक तरुणाने शिक्षण घेणे गरजेचे आहे पण त्याच बरोबर व्यावसायिक शिक्षण घेणे हे पण गरजेचे आहे. सरकार हे गरीब व गरजू होतकरू तरुणांसाठी वेगवेगळे योजना राबवत आहे त्यामधील एक प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आहे या योजनेमुळे गरीब व गरजू होतकरू नागरिकांना साठी आपला स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी शासन प्रशिक्षण तर देतच आहे परंतु कर्ज देखील देत आहे. चला तर मग आपण ही योजना काय आहे हे समजून घेऊ.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी श्रमिक पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्जदारांच्या त्रिस्तरीय पडताळणी होईल व नंतर त्यांना योजनेचा लाभ दिला जाईल. ग्रामीण आणि शहरी संस्थांसाठी पडताळणीसाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. ग्रामीण भागात पडताळणीची जबाबदारी ग्रामविकास आणि पंचायती राज विभागाकडे देण्यात आली आहे. तर शहरी भागात प्रथम स्तरावरील पडताळणी कार्यकारी अधिकारी करणार आहेत.

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे फायदे

या योजनेअंतर्गत पारंपरिक व्यवसायाशी निगडित तरुण कारागिरांना वेगवेगळ्या अठरा व्यवसाय मध्ये एका आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षण दरम्यान त्यांना प्रतिदिवास ₹ ५००/- भत्ता दिला जातो. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना टूल किट खरेदी करण्यासाठी ₹ २०,०००/- दिले जातील. त्याच बरोबर त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेमार्फत एक लाख ते तीन लाख रुपया पर्यंत चे कर्ज हमी शिवाय दिले जाईल.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने अंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी व्यक्ती संबंधित 18 क्षेत्रांमधील असणे आवश्यक आहे.

१. सुतार
२. बोट किंवा नाव बनवणारे
३. लोहार
४. टाळे बनवणारे कारागीर
५. सोनार
६. कुंभार
७. शिल्पकार
८. मेस्त्री
९. मच्छिमार
१०. टूल किट निर्माता
११. दगड फोडणारे मजूर
१२. मोची कारागीर
१३. टोपली, चटई, झाडू बनवणारे.
१४. बाहुली आणि इतर पारंपारिक खेळणी उत्पादक.
१५. न्हावी
१६. हार बनवणारे
१७. धोबी
१८. शिंपी

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता काय आहे

अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 क्षेत्रापैकी एकामधील असावा.
अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 50 वर्षांपेक्षा कमी असावे.
मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या 140 जाती पैकी एक असणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

आधार कार्ड.
पॅन कार्ड.
जात प्रमाणपत्र.
उत्पन्न प्रमाणपत्र.
पत्त्याचा पुरावा.
ओळखपत्र.
बँक पासबुक.
पासपोर्ट आकाराचा फोटो.
चालू मोबाईल नंबर.

ऑनलाइन अर्ज कसा करावा

https://pmvishwakarma.gov.in

या अधिकृत संकेतस्थळावर जा.
मुख्यपृष्ठावर पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना हा पर्याय असेल.
येथे Apply Online पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुम्ही तुमची नोंदणी पूर्ण करा.
नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर SMS येईल.
यानंतर, नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचा आणि योग्य पद्धतीने भरा.
भरलेल्या फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.
आता फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेली माहिती पुन्हा एकदा तपासून बरोबर आहे का याची खात्री करूनच सबमिट करा.

1693414770721 1