.
Water Storage पहा आपल्या जिल्ह्याचा पाणीसाठा किती टक्के शिल्लक आहे?
.
चैत्र महिना म्हणजे तीव्र उन्हाळ्याची सुरुवात. उन्हाळा सुरू होताच जमिनीमधील पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.उन्हाळा म्हटलं की सर्वच ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असते शेतीला पाणी, जनावरांसाठी लागणारे पाणी, रोजच्या वापरातील लागणारे पाणी, पिण्याचे पाणी यासाठी तर ग्रामीण भागामध्ये खूप दूरवर जाऊन पिण्यासाठी पाणी आणावे लागते. केंद्रीय भूजल मंडळाने महाराष्ट्रातील भूजलसाठ्याची आकडेवारी वार्षिक अहवालात जाहीर केली आहे. २०२३ मध्ये महाराष्ट्रात पडलेला पाऊस, त्यातून जमिनीत जिरलेला पाऊस, त्यातून वर्षभरात झालेला पाण्याचा उपसा आणि आता भविष्यकाळासाठी वापरण्यायोग्य उरलेला जलसाठा अहवालात नमूद केला आहे.
चैत्र महिना म्हणजे तीव्र उन्हाळ्याची सुरुवात. उन्हाळा सुरू होताच जमिनीमधील पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.
उन्हाळा म्हटलं की सर्वच ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असते शेतीला पाणी, जनावरांसाठी लागणारे पाणी, रोजच्या वापरातील लागणारे पाणी, पिण्याचे पाणी यासाठी तर ग्रामीण भागामध्ये खूप दूरवर जाऊन पिण्यासाठी पाणी आणावे लागते.
केंद्रीय भूजल मंडळाने महाराष्ट्रातील भूजलसाठ्याची आकडेवारी वार्षिक अहवालात जाहीर केली आहे. २०२३ मध्ये महाराष्ट्रात पडलेला पाऊस, त्यातून जमिनीत जिरलेला पाऊस, त्यातून वर्षभरात झालेला पाण्याचा उपसा आणि आता भविष्यकाळासाठी वापरण्यायोग्य उरलेला जलसाठा अहवालात नमूद केला आहे.
.
गेल्या वर्षीचा पाऊस अन सद्याची भूजल साठ्याची स्थिती
32 अब्ज क्यूबिक मीटर जल पुनर्भरण झाले, तर 16 अब्ज क्यूबिक मीटर पाण्याचा उपसा झाला. सद्या 14 अब्ज क्यूबिक मीटर पाणी जमिनीत शिल्लक आहे. तर 2 अब्ज क्यूबिक मीटर पाण्याची वाफ झाल्याचे अहवालातून दिसून आले.
.
.
कोणत्या जिल्ह्यात किती टक्के पाणी साठा आहे?
अमरावती जिल्हा ९१.८३ उपसा, तर ८.१७% शिल्लक साठा,
अहमदनगर जिल्हा ७९.२० उपसा, २०.८०% शिल्लक साठा,
जळगाव जिल्हा ७८.७६ उपसा, २१.२४% शिल्लक साठा,
सोलापूर जिल्हा ७७.५४ उपसा, २२.४६% शिल्लक साठा,
बुलढाणा जिल्हा ७६.९५ उपसा, २३.०५% शिल्लक साठा,
छ. संभाजीनगर जिल्हा ७१.६४ उपसा, २८.३६% शिल्लक साठा,
पुणे जिल्हा ६९.६५ उपसा, ३०.३५% साठा,
अकोला जिल्हा ६५.५९ उपसा, ३४.४१% शिल्लक साठा,
सातारा जिल्हा ३७.८९ उपसा, ६२.११% साठा,
धाराशिव जिल्हा ६२.०१ उपसा, ३७.९९% शिल्लक साठा,
वाशिम जिल्हा उपसा ६०.२०, शिल्लक साठा ३९.८० %,
बिड जिल्हा ५९.२२ उपसा, शिल्लक साठा ४०.७८ %,
नाशिक जिल्हा उपसा ५८.४१ तर शिल्लक साठा ४१.५९ %,
लातूर जिल्हा ५४.८८ उपसा तर शिल्लक साठा ४५.१२ %,
जालना जिल्हा ५४.८५% उपसा तर शिल्लक साठा ४५.१५%,
सांगली जिल्हा ५४.१९ टक्के उपसा तर शिल्लक साठा ४५.८१%,
वर्धा जिल्हा ५३.५५ उपसा तर शिल्लक साठा ४६.४५%,
धुळे जिल्हा ५१.७७ उपसा तर शिल्लक साठा ४८.२३%