महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार दहावी आणि बारावीचा निकाल मे महिन्यामध्ये लागण्याची शक्यता? आता निकाल पाहता येणार डिजीलॉकर वरून?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकाला ( SSC HSC EXAM RESULT 2025) बाबत मंडळाने दिलेल्या माहितीनुसार मोठी अपडेट समोर येत आहे. बारावीचा निकाल हा गतवर्षी २१ मे ला लागला होता परंतु यावर्षी निकाल हा निकाल १० मे अगोदरच लागेल, त्याचप्रमाणे दहावीचा निकाल हा गतवर्षी २७ मे ला लागला होता परंतु यावर्षी हा निकाल १५ मे अगोदरच लागेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षी मंडळाने निकाल पाहण्यासाठी एक नवीन पद्धत विद्यार्थ्यांसाठी दिली आहे. डिजीलॉकर ॲप च्या माध्यमातून निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावर एकाच वेळी लाखो विद्यार्थी निकाल पाहत असतात अशा वेळेस साईटवर खूप लोड योतो व सर्वांना निकाल पाहता येत नाही. त्याकरिता मंडळ हा निकाल डिजीलॉकर ॲप वर उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.? दहावी आणि बरावीच्या दोन्ही मिळून तब्बल एकवीस लक्ष विद्यार्थांचा निकाल डिजीलॉकर ॲप च्या माध्यमातून पाहायला मिळणार असल्याची शक्यता आहे.
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यास मिळणार मोफत TAB व रोज 6 GB डाटा ! पहा काय आहे योजना?
नमस्कार विद्यार्थी मित्रानो, महाराष्ट्र राज्य शासनाच्या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्या मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना “मोफत टॅबलेट योजना” Free Tablet Yojana Maharashtra सुरू केली गेलीआहे. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे तसेच कागदपत्रे कोणती लागणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. शासन महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच ठिकाणी मोफत प्रशिक्षणाची सोय करत आहे. त्यांना विविध सवलती वेगवेगळ्या योजने मार्फत दिल्या जातात. शासनाने या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक संस्थेची निर्मिती केली आहे. यामध्ये बार्टी, सारथी तसेच महाज्योती या आहेत. आज आपण महाज्योतीमार्फत दहावी पास विद्यार्थ्यांना Free Tablet Yojana मोफत टॅबलेट योजना आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारकार्याचा वसा चालविण्यासाठी, त्यांच्या विचारातला सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) स्थापना शासन निर्णय दि.०८.०८.२०१९ ला केली आहे. तेव्हापासून आज पर्यंत शासन या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे.
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE / NEET / MHT- CET Batch 2026 करीता परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे. त्याकरीता इच्छूक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB / Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्र व पात्रता आणि अर्ज कसा करावा ही संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्याची पात्रता
विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा / असावी.
विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा / असावी तसेच विद्यार्थी नॉन- क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी.
सन 2024 मध्ये 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरीता पात्र राहतील.
विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. या बाबतची कागदपत्रे स्पष्ट व दुष्यपद्धतीने जोडणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणा नुसार करण्यात येईल.
इयत्ता 10 वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यां करीता 70% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां करीता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा नाही कसे हे विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड वरील नमुद पत्त्यावरुन ठरविले जाईल.
विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट)
दिव्यांग असल्यास दाखला.
अनाथ असल्यास दाखला.
सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे
सामाजिक प्रवर्ग
टक्केवारी
इतर मागास वर्ग (OBC)
59 %
निरधीसुचती जमाती अ (VJ-A )
10%
भटक्या जमाती ब ( NT-B)
8%
भटक्या जमाती क (NT-C)
11%
भटक्या जमाती ड (NT-D)
6%
विशेष मागास प्रवर्ग (SBC)
6%
एकूण
100%
टीप – शहरी तसेच ग्रामीण भागाकरीता विद्यार्थ्यांची निवड संख्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठरविण्यात येईल.
समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे
1) प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.
2) दिव्यांगाकरीता 4% जागा आरक्षित आहे.
3) अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.
अर्ज कसा करावा
महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील”Application for JEE / NEET / MHT-CET Batch – 2026 Training” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
2. अर्जासोबत ‘ब’ मध्ये नमुद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन जोडावे.
अटी व शर्ती
अर्ज करण्याची अंतिम दि. 10/07/2024 आहे.
पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.
कोणत्याही माध्यमातुन व अंतीम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारीअसल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल.
अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावा संपर्क क्र 0712-2870120/21
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मागील हप्त्यात म्हणजे २१ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर केला असून बारावीचा निकाल हा ९३.३७% इतका लागला असून नेहमी प्रमाणे मुलींनी आघाडी घेतली आहे.
मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षा मुंबई, पुणे, नागपुर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, लातूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आल्या होत्या त्याचा निकाल २७ मे २०२४ रोजी प्रसिद्ध होणार असून तो निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.
विद्यार्थांना त्यांचे गुण हे विषय निहाय पाहता येणार आहे. तसेच त्याची छापील प्रत ही विद्यार्थांना मिळू शकणार आहे. विद्यार्थ्याला जर स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादन केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत मूल्यांकन करायचे असेल तर संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करता येतो. ( http://verification.mh-ssc.ac.in/)
मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षा मुंबई, पुणे, नागपुर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, लातूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आल्या होत्या त्याचा निकाल २७ मे २०२४ रोजी प्रसिद्ध होणार असून तो निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.
विद्यार्थांना त्यांचे गुण हे विषय निहाय पाहता येणार आहे. तसेच त्याची छापील प्रत ही विद्यार्थांना मिळू शकणार आहे. विद्यार्थ्याला जर स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादन केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत मूल्यांकन करायचे असेल तर संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करता येतो. ( http://verification.mh-ssc.ac.in/)
SSC HSC Result दहावी आणि बारावीच्या निकाला बाबत बोर्डाने काय सांगितले पहा.
दहावी आणि बारावीच्या बोर्डाची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थांना निकालाची आतुरता लागलेली असुन सोशल मीडियावर निकालाच्या तारखे बाबतीत खूपच अफवंचा सुळसुळाट झालेला आहे. परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक सद्या तरी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या निकला बाबत माहिती देण्यात आलेली आहे. मंडळाच्या अध्यक्षा कडून निकाल कोणत्या आठवड्यात लागेल हे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सद्या विद्यार्थांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावी आणि बारावीच्या निकालाबद्दल मोठी माहिती दिली आहे. निकाल तयार करण्याचे काम प्रगती पथावर चालू आहे यंदा बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लागेल आणि आणि दहावीचा निकाल हा मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात म्हणजे शेवटच्या आठवड्या पर्यंत लागेल. दोन्हीही निकालाची तारीख जाहीर केलेली नाही आहे परंतु निकालाचे काम पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकालाची तारीख प्रसिद्ध करण्यात येईल असे सांगितले आहे.
सद्या जवळपास सर्वच राज्याचे HSC व SSC बोर्डाचे निकाल जाहीर झालेले असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा निकाल जाहीर होणे बाकी आहे.
Result SSC HSC दहावी व बारावीचा निकाल कधी लागणार पहा?
.
नमस्कार मित्रांनो आज १मे महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त सर्वांना शुभेच्छा आज लहान वर्गातील सर्वांना निकाल जाहीर होतो. परंतु दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल कधी लागणार याची आतुरता बोर्डाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थांना लागलेली असते.
दहावी आणि बारावीचा निकाल राज्य शिक्षण मंडळाकडून वेळीच लावण्याचे नियोजन चालू असून उत्तपत्रिका तपासणीचे काम प्रगतीपथावर चालू आहे निकाल लवकरच जाहीर होणार आहे. दहावी साठी यावर्षी सतरा लाख विद्यार्थ्यांनी तर बारावी साठी बारा लाख विद्यार्थीनी परीक्षा दिलेली आहे.
दहावीचा SSC चा निकाल हा 6 जून पर्यंत तर बारावीचा HSC चा निकाल 25 मे पूर्वी लावण्याचे नियोजन करण्यात येत आहे?
नमस्कार मित्रांनो आज १मे महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त सर्वांना शुभेच्छा आज लहान वर्गातील सर्वांना निकाल जाहीर होतो. परंतु दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल कधी लागणार याची आतुरता बोर्डाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थांना लागलेली असते.
दहावी आणि बारावीचा निकाल राज्य शिक्षण मंडळाकडून वेळीच लावण्याचे नियोजन चालू असून उत्तपत्रिका तपासणीचे काम प्रगतीपथावर चालू आहे निकाल लवकरच जाहीर होणार आहे. दहावी साठी यावर्षी सतरा लाख विद्यार्थ्यांनी तर बारावी साठी बारा लाख विद्यार्थीनी परीक्षा दिलेली आहे.
दहावीचा SSC चा निकाल हा 6 जून पर्यंत तर बारावीचा HSC चा निकाल 25 मे पूर्वी लावण्याचे नियोजन करण्यात येत आहे?