MSRTC विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी एसटी पास आता शाळेत मिळणार!

आत्ता विद्यार्थांना एसटी पास साठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही. पास आता मिळणार थेट शाळा महाविद्यालयात.!

Pass

.

सन २०२४- २५ शैक्षणिक वर्षाची शाळा दिनांक १५ जून २०२४ रोजी सुरू झाली आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना आणली एसटी चे पास हे आता थेट शाळा महाविद्यालयात मिळणार आहेत. या नवीन योजने मुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालयीन लाखो विद्यार्थी यांना फायदा होईल.

“एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही विशेष मोहीम सर्व महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने राबविण्यात येणार आहे असे मंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी माहिती दिली आहे. ही योजना राबविण्याबाबत सूचना त्यांनी महाराष्ट्रातील सर्व स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहे.

यापूर्वी विद्यार्थी विद्यार्थिनींना बसस्थानकावर जाऊन रांगेत उभे राहून पास घ्यावे लागत असत पण आता यापुढे पास घेण्यासाठी बसस्थानकावर जाण्याची किंवा रांग लावण्याची गरज नाही. शाळा किंवा महाविद्यालयाने दिलेल्या यादी नुसार एसटी कर्मचारी यांच्या मार्फत त्या विद्यार्थी विद्यार्थिनींना थेट शाळे मध्ये येऊन पास वितरित केले जाणार आहेत जेणे करून विद्यार्थांचा वेळ ही वाया जाणार नाही. ही योजना दिनांक १८ जून पासून एसटी प्रशासना मार्फत राबविण्यात येणार आहे. त्यापूर्वी सर्व शाळा महाविद्यालय यांना एसटी च्या आगार प्रमुख यांनी पत्र देऊन आपल्या शाळा महाविद्यालयातील पास धारक विद्यार्थी विद्यार्थिनींची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव उपक्रमाचा फायदा राज्यातील लाखो विद्यार्थीना होणार आहे.

या वर्षातील पहिल्या सत्रातील शाळा सुरू झाल्या असून घरापासून शाळेपर्यंत व शाळेपासून घरापर्यंत ये जा करण्यासाठी विद्यार्थांना व विद्यार्थीनीना महामंडळाच्या एसटी च्या माध्यमातून महाराष्ट्रभर विविध योजना राबविल्या जातात विद्यार्थांना एसटी च्या पास साठी महामंडळ ६६% इतकी सवलत देत आहे तर ३३% प्रवास भाडे भरून मासिक पास देत आहे व विद्यार्थिनी साठी महामंडळ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजने अंतर्गत बारावी पर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थिनींना मोफत पास देत आहे.

click here
1693414770721