मुंबई पुणे सह काही भागात मुसळधार पाऊस, पुढील २४ तासात महाराष्ट्रात पाऊस!
Maharastra Rain Alerts पहा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट घोषित?
पुढील २४ तासात मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पुढील चार दिवस राज्यातील विविधभागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
कोकण, मध्यमहाराष्ट्रमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे सध्या या भागामध्ये पाऊस सुरू आहे. पुढील २४ तासा मध्ये मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे आज पासून पुढील चार दिवस राज्यातील विविध भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची दाट शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
आयएमडीच्या माहिती नुसार आज ९ जून पासून मान्सूनचा प्रवास झपाट्याने होणार असल्याची माहिती दिली आहे, त्यामुळे राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी उत्तर कोकण, दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यास आला आहे.
विदर्भ, मराठवाडा व उत्तर मध्य महाराष्ट्रात ही मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर उद्या दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तरी शेतकऱ्यांनी शेतीतील पेरणी पूर्व सर्व कामे लवकरात लवकर करून घ्यावीत. पाऊस हा भरपूर प्रमाणात पडणार असला तरी शेतकऱ्यांनी खरी हंगामाची पेरणी करताना गरबड करू नये असा सल्ला कृषी विभागा मार्फत देण्यात आला आहे.
सद्या पुण्यामध्ये जोरदार पाऊस पडत असून मुंबईतही पावसाचे आगमन झालेले आहे. येत्या काही तासातच मुंबईसह उपनगर, अहमदनगर, पालघर, सोलापूर, सांगली, नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यातील जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर,वाशिम, चंद्रपूर या जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी शेतकऱ्यांनी व नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील आयएमडी कडून करण्यात आलेलं आहे.