MH Govt शिंदे सरकारची घोषणा! पहा महिलांसाठी कोणती योजना आणली!

1000704171

शिंदे सरकारची घोषणा! पहा महिलांसाठी कोणती योजना आणली!

आत्ताच मागील महिन्यात लोकसभेचे मतदान झाले आणि केंद्रामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि आत्ता त्या पाठोपाठच राज्यातील विधानसभेच्या तयारीची लगबग पाहायला मिळत आहे. जशी विधानसभा निवडणुक जवळ येत आहे तसे राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार वेगवेगळ्या योजनाची खैरात करताना पाहायला मिळत आहे. अशीच एक योजना काल परवा सरकारने जाहीर केली आहे “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण”

महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अंनिमियाचे प्रमाणे ५० पेक्षा जास्त आहे. तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी ५९.१०% टक्के व स्त्रियांची टक्केवारी २८.७०% टक्के इतकी आहे. ही वस्तूस्थिती लक्षात घेता, महिलांच्या आर्थिक व आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबना साठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.

योजनेचा उद्देश

  • राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.
  • त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
  • राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.
  • राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे.
  • महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा.

योजनेचे स्वरुप

पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (Direct Beneft Transfer) दरमहा रु.१,५००/- इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र/ राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजने व्दारे रु.१.५००/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजने व्दारे पात्र महिलेस देण्यात येईल.

योजनेचे लाभार्थी

महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वयो गटातील विवाहित, विधवा,
घटस्पोटित, परितक्त्या आणि निराधार महिला.

योजनेसाठी लाभार्थ्यांची पात्रता

  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
  • किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  • सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखा पेक्षा जास्त नसावे.

अपात्रता

  • ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयां पेक्षा अधिक आहे.
  • ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी / कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
  • सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजने व्दारे रु.१,५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/ आमदार आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/ सदस्य आहेत.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.
  • ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

सदर योजनेच्या “पात्रता” व “अपात्रता” निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकताअसल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेवून शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्र

  • योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे.
  • लाभार्थ्याचे आधार कार्ड.
  • महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी, अधिवास प्रमाणपत्र / महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
  • सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला(वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य).
  • बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • रेशनकार्ड छायांकित प्रत.
  • सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

योजनेची कार्यपध्दती तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया

  • योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल ॲपद्वारे/सेतू सुविधा केंद्रा व्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे.
  • पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
  • ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्याच्यासाठी “अर्ज” भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये(नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.
  • वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात / बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये(नागरी/ग्रामीण/आदिवासी) / सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यां द्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोहच पावती दिली जाईल.
  • अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
  • अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणे करून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. यासाठी महिलेने पुढील माहिती आणणे आवश्यक आहे. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र ( रेशनकार्ड) आणि स्वतःचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
click here
1693414770721

Ration Card – शिधापत्रिका होणार बंद?

ration

Ration Card – शिधापत्रिका होणार बंद?

आजकाल शिधापत्रिका ही गोरगरिबांची कैवारी मानली जात आहे कारण स्वस्त दरामध्ये धान्य मिळत आहे. हातावरचे पोट असणाऱ्या व मोलमजुरी करणाऱ्या गरीब वर्गाला दोन वेळेस पोटभर अन्न आज या योजनेतून मिळत आहे.
एवढेच नाही तर या शिधापत्रिकेचा वाफर हा सर्वच स्तरातील लोकांना होत आहे.
हा एक प्रकारचा रहिवाशी पुरावा देखील आहे.
आत्ता ही शिधापत्रिका जगाबरोबर डिजिटल होणार आहे. सरकारने या बाबत निर्णय घेतला आहे की शिधापत्रिका ही ई-शिधापत्रिका करण्याचा. लवकरच शिधापत्रिका ही ई-शिधापत्रिका होणार आहे. जुन्या शिधापत्रिकेची छपाई ही सरकारने बंद केली आहे.

या साठी जिल्हातील सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्र या सर्वांना लवकरच या बाबतीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ई-शिधापत्रिका देण्याची कार्यवाही सरकार लवकरच करणार आहे.

ई-शिधापत्रिकेचे अनेक फायदे आहेत त्यामुळे शिधापत्रिका हरवण्याचे किवा खराब होण्याची चिंता नाही. किंवा शिधापत्रिकेचा वापर चुकीच्या पद्धतीने होण्याची श्यकताही कमी होणार आहे.

ई-शिधापत्रिका मिळवण्यासाठी नागरिकांना मोबाईल ॲप डाऊनलोड करून कागदपत्र अपलोड करावी लागणार आहेत किंवा सेतू सुविधा केंद्र किंवा आपले सरकार केंद्र या ठिकाणी जाऊन कागदपत्र अपलोड करावी लागणार आहेत. तर तहसील कार्यालयात कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे.
ज्या नागरिकांकडे शिधापत्रिका आहेत त्यांना ई-शिधापत्रिका करून घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

या निर्णयामुळे, गरीब आणि गरजू नागरिकांना धान्य मिळण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल.

1693414770721