EPFO धारकांसाठी खुशखबर! तुमचे PF चे पैसे मिळणार आता लवकरात लवकर?

EPFO ऑटो क्लेम सेटलमेंट सेवे मुळे दावे लवकर निकाली निघणार! मर्यादा ५०,०००/- रुपयां वरून १,००,०००/- केल्याची माहिती?

PF

EPFO धारकांसाठी खुशखबर! तुमचे PF चे पैसे मिळणार आता लवकरात लवकर? EPFO extends auto claim settlement facility

EPFO ची स्थापना ही १९५२ मध्ये झालेली असून सुरवातीला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यांचा लाभ दिला जात होता परंतु आता खाजगी कर्मचाऱ्यांना देखील याचा लाभ मिळत आहे. बदलत्या काळाच्या ओघांमध्ये ईपीएफओ ने नवनवीन योजना आणून त्यात दिवसेंदिवस बरेच बदल केलेले आहेत. EPF योजनेमध्ये कर्मचारी आणि कंपन्यांकडून दर महिन्याला PF फंडात जे योगदान दिले जाते त्यावर वार्षिक आधारावर सरकारकडून व्याज दिले जाते. सेवानिवृत्ती नंतर कर्मचाऱ्याला मोठा निधी व मासिक पेन्शनचा लाभ दिला जातो.

EPFO कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या लाखो सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता EPFO ने आपल्या सदस्यांसाठी ऑटो क्लेम सेटलमेंट ही नवीन सुविधा दिली आहे व तिची व्याप्ती वाढवली आहे. म्हणजे आता लग्न, घर बांधणे, रोगावरील उपचार, आपल्या सर्वांवरील दावे लवकर निकाली काढली जाणार आहेत. आता EPFO ने ऑटो क्लेम सेटलमेंट ची मर्यादा ५०,०००/- रुपयां वरून १,००,०००/- केल्याची माहिती दिली आहे

EPFO ने ऑटो क्लेम सोल्यूशन सुरू केले आहे यामध्ये IT (तंत्रज्ञान) प्रणालीद्वारे दावे निकाली काढले जानार आहेत. आजारावरील उपचारांसाठी ॲडव्हान्स क्लेम सेटलमेंटसाठी ऑटो मोड सुविधा ही एप्रिल २०२० पासूनच सुरू केली गेली आहे. मागील आर्थिक वर्षात त्यांनी साडेचार कोटी दावे निकाली काढली आहेत. यातील ६०% अधिक दावे हे आगाऊ दावे होते.

ऑटो क्लेम सेटलमेंट प्रणाली मध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप राहणार नसून यापूर्वी दावे निकाल काढण्यासाठी जास्त वेळ लागत होता तो लागणार नसून आता लवकरात लवकर दावे निकाली लागणार आहेत. यामध्ये केवायसी, पात्रता व बँक प्रमाणीकरण ही प्रक्रिया आपोआप केले जाणार आहे. त्यामुळे दावे निकली काढण्यासाठी दहा ते पंधरा दिवस लागत होतं ते आता तीन ते चार दिवसात होणार आहे.

जर कोणत्याही दाव्याचे निराकरण IT प्रणालीद्वारे केले गेले नाही तर ते नाकारले किंवा परत केले जाणार नाही. याउलट IT प्रणालीद्वारे दावा निकाली काढला नाही तर दुसऱ्या स्तरावरील छाननी आणि मंजुरीद्वारे निकाली काढला जाईल. अशा स्थितीत, EPFO च्या ऑटो क्लेम केल्यानंतर आता घर, लग्न किंवा शिक्षणासाठी केलेले दावे कमी वेळेत निकाली काढले जातील जेणेकरून EPFO धारकांसाठी लवकरात लवकर निधी मिळू शकेल.

.EPFO कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या लाखो सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता EPFO ने आपल्या सदस्यांसाठी ऑटो क्लेम सेटलमेंट ही नवीन सुविधा दिली आहे व तिची व्याप्ती वाढवली आहे. म्हणजे आता लग्न, घर बांधणे, रोगावरील उपचार, आपल्या सर्वांवरील दावे लवकर निकाली काढली जाणार आहेत. आता EPFO ने ऑटो क्लेम सेटलमेंट ची मर्यादा ५०,०००/- रुपयां वरून १,००,०००/- केल्याची माहिती दिली आहे

click here
1693414770721