महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार दहावी आणि बारावीचा निकाल मे महिन्यामध्ये लागण्याची शक्यता? आता निकाल पाहता येणार डिजीलॉकर वरून?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकाला ( SSC HSC EXAM RESULT 2025) बाबत मंडळाने दिलेल्या माहितीनुसार मोठी अपडेट समोर येत आहे. बारावीचा निकाल हा गतवर्षी २१ मे ला लागला होता परंतु यावर्षी निकाल हा निकाल १० मे अगोदरच लागेल, त्याचप्रमाणे दहावीचा निकाल हा गतवर्षी २७ मे ला लागला होता परंतु यावर्षी हा निकाल १५ मे अगोदरच लागेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षी मंडळाने निकाल पाहण्यासाठी एक नवीन पद्धत विद्यार्थ्यांसाठी दिली आहे. डिजीलॉकर ॲप च्या माध्यमातून निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावर एकाच वेळी लाखो विद्यार्थी निकाल पाहत असतात अशा वेळेस साईटवर खूप लोड योतो व सर्वांना निकाल पाहता येत नाही. त्याकरिता मंडळ हा निकाल डिजीलॉकर ॲप वर उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.? दहावी आणि बरावीच्या दोन्ही मिळून तब्बल एकवीस लक्ष विद्यार्थांचा निकाल डिजीलॉकर ॲप च्या माध्यमातून पाहायला मिळणार असल्याची शक्यता आहे.
RTE ADMISSION EXTENSION सन २०२५-२०२६ शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासवर्ग घटकाकरिता २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही दिनांक १४ जानेवारी २०२५ पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती तर २७ जानेवारी २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. परंतु त्यास आज मुदतवाढ मिळाली आहे.
२५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही दिनांक १४ जानेवारी २०२५ पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती तर २७ जानेवारी २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. परंतु आज त्यास मुदतवाढ मिळाली असून दिनांक ०२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. तरी पालकांना अर्ज भरण्यास आणखीन सहा दिवस अवधी मिळाला आहे.
आज RTE पोर्टलवर दिसत असलेल्या आकडेवारी नुसार ८ हजार ८६३ शाळांची नोंदणी झाली असून १ लाख ९ हजार १११ जागा उपलब्ध आहेत. पोर्टल वरील सूची नुसार आज पर्यंत २ लाख ५९ हजार २९३ अर्ज दाखल झालेले आहेत. व मुदतवाढ मिळाल्यामुळे आणखीन अर्ज दाखल होणार आहेत.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे संपूर्ण शेड्युल पहा.
MaharastraTET Exam 2024 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ घेण्या संदर्भात परिपत्रक जाहीर झालेले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आज दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी हे परिपत्रक जाहीर केलेले आहे. तरी या परिपत्रका मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी (TET) परीक्षेचे वेळापत्रक दिले आहे. या वेळापत्रका प्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ही १० नोव्हेंबर २०१४ रोजी घेण्यात येणार आहे असे नमूद केले आहे. दोन पेपर होणार असल्याने सकाळच्या सत्रा मध्ये एक तर दुपारच्या सत्रात एक असे दोन पेपर होणार असून तसे परीक्षेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनी दिलेली आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवी साठी सर्व व्यवस्थापन तेसच सर्व परीक्षा मंडळे व सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित व कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्ती होण्यासाठी उमेदवारांना प्रथम ही परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. या परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरणे तसेच परीक्षा शुल्क भरणे व परीक्षेची वेळ या बातमीतची माहिती तसेच परीक्षेश संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती व सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर दिली आहे. या परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ९ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होणार आहे. व अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे.
➧ परीक्षेचे वेळापत्रक.
➤ परीक्षेचे ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी हा ९ सप्टेंबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ आहे. ➤ परीक्षेचे प्रवेश पत्र ऑनलाइन प्रिंट काढण्यासाठी दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ ते १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत वेळ मिळणार आहे. ➤ १० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० ते १.०० दरम्यान शिक्षक पात्रता परीक्षेचे पहिला पेपर होणार आहे व त्यानंतर दुपारच्या सत्रात २.०० ते ४.३० दरम्यान दुसरा पेपर होणार आहे.
➧ संपूर्ण जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक वर जा.
शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत (RTE) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला दि.३१ जुलै २०२४ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. परंतु काही पालक आणि संघटनांनी जास्तीचा वेळ वाढून मागितल्या मुळे ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे अद्याप प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे.
पाच ऑगस्टपर्यंत मुदतवाढी बाबतची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी परिपत्रका द्वारे दिली आहे. शिक्षण विभागाने फेब्रुवारी मध्ये RTE प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलांमुळे न्यायालयीन प्रकरण समोर आले होते. शिक्षण विभागाने केलेला बदल हा न्यायालयाने घटनाबाह्य असल्याचे सांगितले. त्यामुळे शिक्षण विभागाला पूर्वीप्रमाणेच RTE प्रवेश प्रक्रिया राबवावी लागली आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुमारे दोन महिने चालल्याने या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला.
या वर्षी राज्यातील ९ हजार २१७ शाळां मध्ये १ लाख ५ हजार २४२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. त्यासाठी दाखल झालेल्या २ लाख ४२ हजार ५१६ प्रवेश अर्जां मधून ९३ हजार ९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याचे जाहीर झाले. तसेच प्रतीक्षा यादीत ७१ हजार २७६ विद्यार्थी आहेत. शिक्षण विभागाने प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चिती साठी २३ जुलै ते ३१ जुलै पर्यंतची मुदत दिलेली होती. ही मुदत बुधवारी ३१ जुलैला संपली आहे. मात्र या मुदतीत ३९ हजार ४०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला होता. या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ मिळाल्याने अद्याप प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेश घेण्यासाठी आणखीन पाच दिवसाचा वेळ मिळाला आहे.
सद्या जे लोक शिक्षक भरती ची चातका सारखी वाट पाहत आहेत त्यांच्या साठी ही बातमी आनंदाची बाब आहे. कारण राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितल्या प्रमाणे शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मागील जाहीर केलेली भरती प्रक्रिया ही सुरूच आहे. परंतु आता ही नवीन भरती प्रक्रिया जुलै महिन्या अखेर किंवा ऑगस्ट महिन्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त ३०% जागा मधील १०% जागांची जाहिरात ही शिक्षण अधिकाऱ्यांना पवित्र पोर्टल वर अपलोड करता येणार आहे. तसेच खाजगी अनुदानित संस्थांना देखील सहभाग घेता येणार आहे. जिल्हा परिषद मधील साडेतीन हजार तर खाजगी संस्थांमधील सहा ते साडेसहा हजार जागा भरल्या जाणार आहेत.
मागील दहा वर्षांतील सर्वात मोठी शिक्षक भरती होणार असून त्या मध्ये जिल्हा परिषदांच्या शाळां मधील २२ हजार पदांचा समावेश आहे. दरम्यान, शासनाच्या निर्णयानुसार २० टक्के पदे रिक्तच राहतील, पण बिंदूनामावलीतील “एनटी-सी” प्रवर्गाच्या आक्षेपामुळे १० टक्के पदे रिक्त ठेवण्यात आली होती. परंतु आता ती पदे ऑगस्टमध्ये भरली जाणार आहेत. यावेळी ज्या खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांना मागच्यावेळी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात अपलोड करता आली नाही त्यांना आता संधी मिळणार आहे. याशिवाय बिंदूनामावली अपूर्ण असल्याने ज्या महापालिका, नगरपालिकांना त्यांच्या शाळांमधील शिक्षक भरतीची जाहिरात अपलोड करता आली नाही, त्यांनाही यावेळी रिक्त पदांवर शिक्षक मिळणार आहेत.
शिक्षक भरतीपूर्व “TET” ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणार
शिक्षक होण्यासाठी D Ed व B Ed उत्तीर्ण उमेदवारांना TET (शिक्षक पात्रता परीक्षा) पास होणे गरजेचे आहे. त्यानंतर बीएड धारक उमेदवारांना नोकरीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून “TET” घेण्याचे नियोजन चालू आहे. त्यासंबंधीची निविदा काढण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आलेली आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये TET घेतली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे.
खाजगी संस्थांची भरती देखील पवित्र पोर्टल वरून.
राज्यातील खाजगी अनुदानित संस्थांच्या मनमानीला आवर घालत आता त्यांची शिक्षक भरती देखील पवित्र पोर्टलद्वारे होणार आहे. एका रिक्त जागेसाठी दहा उमेदवार त्या संस्थेस पाठवले जातात व त्या दहा मधून मुलाखतीच्या माध्यमातून एका उमेदवाराची निवड शिक्षक पदी केली जाते. त्या दहा उमेदवाराशिवाय इतरत्र अन्य उमेदवाराला शिक्षक म्हणून संस्थेत घेता येत नाही.
Maharastra Government News Education News महाराष्ट्र राज्य सरकारने EWS, SBEC, OBC, विद्यार्थिनी साठी मोठी घोषणा केली आहे? मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय?
EWS, SEBC, OBC विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा?
जसं जशी विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे तसं राज्यसरकार वेगवेगळ्या योजनाची घोषणा करताना पाहायला मिळत आहे आत्ताच मागील काही दिवसापूर्वी राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनेची घोषणा केली आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने मंत्री मंडळाच्या बैठकीत विद्यार्थिनी साठी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. EWS, SBEC, OBC विद्यार्थिनी साठी फीसमध्ये ५०% सवलत राज्य सरकार देत होते परंतु आता ही सवलत १००% देण्याबाबत काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे आढळून आले आहे व लवकरच त्याबाबतीत अधिकृत घोषणा केली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग, आणि इतर मागास प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या र्विद्यार्थिनींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कात ५०% सूट दिली जात होती परंतु आता या शुल्कात वाढ करून ती १००% सूट दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळणार आहे.