सद्या सर्वत्र पावसाने थैमान घातलेले असून अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेले आहे. काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य परिस्थिती पाहायला मिळली आहे. अनेक ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झालेली आहे. या होणाऱ्या अतिवृष्टी मुळे पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. या होणाऱ्या नुकसानी मुळे शेतकरी राजा चिंता व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्याने पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्याने पिकाची नुकसान भरपाई साठी तक्रार करणे गरजेचे आहे. चला तर मग आपण पाहूया नुकसानी बद्दल कशी ऑनलाईन तक्रार करायची.
सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण खरीप हंगामातील पीक विमा भरला असेल आणि आपल्या पिकाचे नुकसान जास्तीच्या पावसामुळे झाले असेल तर हे काम करा. आपणास पीक नुकसानीची पुर्वसचना ही पिकाचे नुकसान झाल्यापासून ७२ तासाच्या आत (३ दिवसाच्या आत) देणे गरजेचे आहे. त्यामुळे पीक नुकसानीची पूर्व सूचना अगोदर देणे गरजेचे आहे. पुर्वसुचना उशिरा दिल्यास सदरची पुर्वसचना ग्राह्य धरली जानार नाही. त्यासाठी आपणास दोन पर्याय आहे एक म्हणजे १४४४७ या toll-free नंबर वर कॉल करून देणे किंवा दुसरा म्हणजे Crop insurance या ॲप वरून द्यावी. पूर्व सूचना दिल्याशिवाय स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकांतर्गत विमा मिळत नाही. तसेच पूर्वसूचना देताना १) Excess rainfall (अतिवृष्टी), २) Inundation ( पूर ), ३) Heavy rainfall (मुसळधार पाऊस) या पैकी पर्याय निवडून पूर्व सूचना द्यावी.
१) कुणीही कीड व रोगासाठी पुर्वसूचना देऊ नये. अशा पूर्व सूचना विमा कंपनी मार्फत रद्द होतात.
२) यावर्षीपासून पिकाच्या कोणत्याही वाढीच्या अवस्थेत पूर्व सूचना दिल्यास नुकसान भरपाई ही पिक कोणत्या वाढीच्या अवस्थेत आहे हा विचार न करता पिकाचे नुकसान किती टक्के झाले यानुसार नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामुळे वाढीच्या अंतिम अवस्थेची वाट न बघता नुकसान झाले त्यावेळेस तात्काळ पुर्वसुचना द्यावी.
३) पूर्व सूचना दिल्यानंतर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या Docket Id सांभाळून ठेवावा किंवा पीक विमा पावती वर लिहून ठेवावा.