BANK HOLIDAYS आठवड्यात पाच दिवस राहणार बँकांना सुट्टी ?
नमस्कार मित्रांनो जग जरी ऑनलाईन (Digital) झाले असते तरी आर्थिक व्यवहारासाठी सर्वांनाच बँकेत जाण्याची गरज ही वेळोवेळी पडतच आहे. आणि जर बँकेला सलग काही दिवस सुट्टी असेल तर आपल्या आर्थिक अडचणी वाढतात. त्यासाठी बँकाच्या सुट्ट्या पाहून आपले आर्थिक नियोजन करणे अपेक्षित आहे.
असंच काहीसं या आठवड्यात बहुतेक होणार असल्याचे दिसत आहे. या आठवड्यात सन वार आल्यामुळे एका आठवड्यात बहुतेक पाच दिवस सुट्टी राहण्याची शक्यता आहे.
दि. ९ एप्रिल ला मराठी नववर्ष गुढीपाडव्याची सुट्टी आहे तर दि. १० एप्रिल ला बोहाग बिहू हा सनअसल्यामुळे काही राज्यमध्ये सुट्टी राहण्याची शक्यता आहे व दि. ११ एप्रिल ला रमजान ईद निमित्त सुट्टी आहे तसेच दि.१३ एप्रिल ला दुसरा शनिवार आहे व दि. १४ एप्रिल ला रविवार आहे. असे एकूण आठवड्यात पाच दिवस सुट्टीचे असतील.
या आठवड्यामध्ये दोनच दिवस बँक चालू राहणार असेल दिनांक ८ एप्रिल व १२ एप्रिल. बाकी दिवस बँक बंद राहण्याची शक्यता आहे?