महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितली तारीख!

.
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. (mukhyamantri ladki bahin yojna january 2025) जानेवारी महिन्याचा लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता अद्याप पर्यंत महिलांच्या खात्यावर जमा झालेला नाही. सर्व लाभार्थी महिलांना आशा होती की जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकर संक्रातीच्या अगोदर खात्यात जमा होईल, परंतु हा सातवा हप्ता आणखीनही महिलांच्या खात्यावर जमा झालेला नाही.
याबाबत एक आनंदाची बातमी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. या वर्षातला पहिला महिना जानेवारी या महिन्याचा लाडक्या बहिणीचा पंधराशे रुपये हप्ता २६ जानेवारीच्या अगोदर सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. हा हप्ता जमा करण्यासाठी लागणारे आर्थिक नियोजन हे अर्थ खात्याकडून आमच्या विभागाकडे प्राप्त झाले आहे. तरी २६ जानेवारीच्या आगोदर लाभार्थी महिलांच्या खात्यात या सातव्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत. अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.
महिला व बाल कल्याणमंत्री आदिती तटकरे काय काय म्हणाल्या खालील व्हिडिओ पहा.


