राज्यातील विविध भागांत आलेल्या नैसर्गिक आपत्ती, तांत्रिक अडचणी आणि वाहतूक व्यवस्थेतील अडथळे यामुळे अनेक लाभार्थींना “माझी लाडकी बहीण” योजनेसाठी आवश्यक असलेली e-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही. या परिस्थितीची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री यांनी e-KYC प्रक्रियेस 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे.
सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, अद्याप e-KYC न केलेल्या सर्व लाभार्थींना ही संधी मिळत असून, योजनेचा लाभ अखंडितपणे मिळावा यासाठी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य सरकारने स्पष्ट केले की, ही मुदतवाढ ही लाभार्थी बहिणींना दिलासा देण्यासाठी करण्यात आलेली असून, कोणत्याही अडचणीशिवाय योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
देशातील कामगारांना अधिक पारदर्शक व सुरक्षित सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन लेबर कायद्यात मोठ्या बदलांची घोषणा करण्यात आली आहे. ग्रॅच्युइटीपासून ते किमान वेतनापर्यंत, अनेक नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली असून त्याचा थेट फायदा कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होणार आहे.
➧ ग्रॅच्युइटी नियमांमध्ये मोठा बदल. नवीन तरतुदीनुसार ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी आता पाच वर्षांची सलग सेवा अनिवार्य राहिलेली नाही. कोणत्याही संस्थेमध्ये फक्त एक वर्ष सेवा पूर्ण केल्यावरही कर्मचारी ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरणार आहेत. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कार्यरत असलेले कर्मचारीही या तरतुदीचा लाभ घेऊ शकतील.
➧ कामाचे तास आणि ओव्हरटाईमबाबत कडक अंमलबजावणी. किमान वेतनासोबत ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ओव्हरटाईम करण्यासाठी जबरदस्ती करता येणार नाही. राज्य सरकार ओव्हरटाईमची कमाल मर्यादा निश्चित करेल. तसेच कामाच्या पात्रतेची अट 240 दिवसांवरून 180 दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे.
➧ नियुक्ती पत्र देणे सर्व नियोक्त्यांवर बंधनकारक. कोणत्याही कर्मचाऱ्याला नियुक्त करताना त्याला औपचारिक नियुक्तीपत्र देणे आता अनिवार्य आहे. त्यात पगार, कामाचे तास, जबाबदाऱ्या व इतर अटी स्पष्ट उल्लेखलेल्या असणे आवश्यक आहे. यामुळे कर्मचारी–नियोक्ता संबंध पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट आणि सुरक्षित होणार आहेत.
➧ वेतन वेळेत देणे आवश्यक; उशीर केल्यास दंड. सर्व क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना निश्चित तारखेत पगार देणे अत्यावश्यक आहे. पगार देण्यात उशीर केल्यास संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षितेत वाढ होणार आहे.
➧ अपघाताची व्याख्या बदलली; घर–काम प्रवासातील दुर्घटना समाविष्ट. घरातून कामाच्या ठिकाणी जाताना किंवा कामावरून घरी येताना झालेल्या अपघाताला आता रोजगार-संबंधित दुर्घटना मानले जाईल. अशा परिस्थितीत सर्व प्रकारच्या लाभांसाठी कर्मचारी पात्र ठरेल.
➧ ESI योजनेचा व्याप वाढला. दुकाने, बागायती, कृषी आणि विविध औद्योगिक क्षेत्रांतील अधिक कर्मचारी आता ESI योजनेत समाविष्ट होणार आहेत. यामुळे वैद्यकीय विमा, मातृत्व लाभ, अपंगत्व विमा यांसारख्या सुविधांचा लाभ अधिक कामगारांना मिळेल.
➧ मीडिया आणि डिजिटल कर्मचाऱ्यांसाठी औपचारिक नियुक्ती अनिवार्य. OTT प्लॅटफॉर्मवरील कर्मचारी, पत्रकार, डिजिटल संपादक आणि कंटेंट निर्मात्यांना आता नियमित नियुक्तीपत्र देणे अनिवार्य आहे. यामुळे कामाचे तास, जबाबदाऱ्या आणि वेतन संरचना स्पष्ट होईल.
➧ देशभर एकसमान किमान वेतन लागू होणार. केंद्र सरकार संपूर्ण देशासाठी राष्ट्रीय किमान वेतन दर निश्चित करणार आहे. यापेक्षा कमी वेतन कोणतेही राज्य सरकार देऊ शकणार नाही. या निर्णयामुळे सर्व क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांसाठी एकसमान पगाराची अंमलबजावणी होणार आहे.
➧ IT आणि निर्यात क्षेत्रात वेळेत वेतन देणे बंधनकारक. IT, ITES, वस्त्रोद्योग, बंदरे आणि निर्यात क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेपर्यंत देणे अनिवार्य आहे. उशीर केल्यास कंपनीवर कारवाई केली जाईल.
➧ 40 वर्षांवरील कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक मोफत आरोग्य तपासणी. चाळीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याची वर्षातून एकदा मोफत आरोग्य तपासणी कंपनीने करणे आवश्यक आहे. तपासणीचा संपूर्ण खर्च कंपनीवरच राहणार आहे.
पहा कसे करायचे लालपरी चे तिकीट घरबसल्या मोबाईल वरून आरक्षित. पहा पूर्ण माहिती.
सद्या धावपळीच्या युगात सर्वांकडे वेळ कमी आहे. बसस्थानक पर्यंत जाऊन तिथे रांगेत उभा राहून तिकीट आरक्षित करण्यात इतका वेळ नाही. एस टी महामंडळाने पण आता कात टाकली आहे. जगा सोबत बदलत एस टी महामंडळाने ही अनेक नवनवीन बदल केले आहेत जसे की ऑनलाईन तिकीट, बस ट्रेकिंग, नवनवीन अत्याधुनिक सर्व सोई युक्त बस गाड्या. अशा अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. msrtc reservation app
➧ असे करा ऑनलाईन घरबसल्या मोबाईल वरून तिकीट आरक्षित.
सर्व प्रथम आपणांस आपल्या मोबाईल मध्ये गूगल प्ले स्टोअरवर जाऊन एस टी महामंडळाचे अधिकृत ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहे. MSRTC Bus Reservation हे ॲप आहे. https://play.google.com/store/apps/details?id=com.itms_consumer.msrtc.msrtc याची लिंक ही असून ॲप डाउनलोड करून झाल्यानंतर ॲप उघडल्यास वरती डाव्या कोपऱ्यात लॉगिन बटणावर क्लिक करून लॉगिन करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती भरून लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करून लॉगिन करून घ्यावे कारण लॉगिन केल्याशिवाय तिकीट आरक्षित करता येत नाही. bus seat reservation
ॲपच्या होम पेज वर आल्यावर पासून-पर्यंत असे दोन पर्याय दिसतील त्या मध्ये गाडी शोधण्यासाठी पासून पर्यंत चे ठिकाण टाका व त्यानंतर प्रवासाचा दिनांक निवडा. नंतर बस शोधा या लाल बटणावर क्लिक करा. पुढील पेज वर त्या मार्गावरील सर्व बस दिसतील त्यातील आपल्याला ज्या बसची बुकिंग करायची आहे ती बस सलेक्ट करणे. व नंतर बसण्याचे आणि उतरण्याचे ठिकाण निवडल्या नंतर लगेच बसची आसन शमता म्हणजेच सीट नंबर चे पेज ओपन होईल. त्यामध्ये निळ्या कलरचे सीट नंबर हे बुक झालेले असतील, पिंक कलरचे सीट हे महिला साठी असतील, जांभळ्या रंगाचे सीट हे ज्येष्ठ नागरिकांसाठी असतील, लाल रंगाचे सीट हे अपंगांसाठी असतील तर पांढऱ्या रंगाचे सीट हे सामान्य प्रवाशांसाठी असतील.
रिकामे असलेल्या सीट नंबर पैकी आपणास लागतील तेवढे सीट नंबर सलेक्ट करा. व नंतर प्रवाशाची माहिती भरा जसे की नाव, लिंग, वय व प्रवाशी सवलत कोणती आहे ही सर्व माहिती भरा व त्यानंतर खाली आपला मोबाईल नंबर टाका आणि गो टू पेमेंट (Go to Payment) वर क्लिक करा. लगेच आपण भरलेली सर्व माहिती आपणासमोर ओपन होईल. ती सर्व तपासून पेमेंट करण्यासाठी पुढे जा. तिथे तुम्हाला तीन ऑप्शन मिळतील एक डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड. दुसरे युपिआय पेमेंट. व तिसरे नेट बँकिंग या पैकी एका प्रकाराने पेमेंट करा. पेमेंट पूर्ण झाल्या बरोबर लगेच आपणास आरक्षित झालेले तिकीट मिळेल. हे मिळालेले तिकीट घेऊन आपण त्या बस मध्ये प्रवास करू शकतो. हे तिकीट हे ई- तिकीट असल्या मुळे बस मध्ये प्रवास करताना वाहकाला याची हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी दाखवली तरी चालते परंतु प्रवास करताना आपल्या सोबत एक आय-डी प्रुफ असणे आवश्यक आहे.
लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीये पर्यंत होणार महिलांच्या खात्यात जमा?
सध्या महाराष्ट्र मध्ये लाडकी बहिणी योजना (Mukhyamantri Ladki Bahin Yojna) चर्चेत असून या योजनेचा दहावा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता हा आणखीन महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या नसून लाभार्थी महिला भगिनी या हप्त्याची वाट चातकासारखी पाहताना दिसून येत आहेत. खरं पाहता एप्रिल महिन्याचा हा शेवटचा आठवडा आहे. तरी देखील आणखीन लाभार्थी महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झालेले नाहीत.
एप्रिल महिन्याचा लाडक्या बहिणीचा पंधराशे रुपये हप्ता हा लवकरात लवकर म्हणजेच अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर 30 तारखेच्या अगोदर लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती महिला व बाल विकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.?
विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणी योजनेची अर्ज पडताळणी चालू केलेली असून आणखीनही चालूच आहे. या योजनेच्या निकषांनुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. जसेकी ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार पेक्षा अधिक आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच पात्र महिलांच्या खात्यावर हे पंधराशे रुपये जमा होणार आहेत.
स्वतः उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले!
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. (mukhyamantri ladki bahin yojna February 2025) फेब्रुवारी महिन्याचा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा हप्ता अद्याप पर्यंत महिलांच्या खात्यावर जमा झालेला नाही. सर्व लाभार्थी महिलांना आनंदाची बातमी आज स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
आज जालना जिल्ह्यातील परतूर येतील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलताना म्हणाले की, महिला व बालविकास खात हे आमच्या आदिती तटकरे यांच्या कडे आहे. त्यांनी या योजने मध्ये खास लक्ष घातले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली तेव्हापासून या योजने मुळे आमच्यावर भरपूर टीका झाली. आज हेच मीडिया वाले सांगतात की ही योजना बंद होणार?. परंतू आम्ही शब्दाचे पक्के आहोत. आम्ही दिलेला शब्द पाळतो. ही योजना बंद होणार नाही. कालच मी या योजनेसाठी लागणाऱ्या रकमेसाठी मंजुरी दिली आहे. आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा पंधराशे रुपये हप्ता हा आठ दिवसामध्ये सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे असे सांगितले.
महायुती सरकार मधील पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला. राज्यातील नवीन सरकारकडून नुकतीच पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीची पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वतः कडे घेतली आहे तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पुण्यासह सद्या चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्याकडे मुंबई शहरासह ठाण्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे.
पालकमंत्री पदाची संपूर्ण यादी
• गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
• मुंबई शहर व ठाणे – एकनाथ शिंदे
• पुणे व बीड – अजित पवार
• नागपूर व अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
• अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे
• सांगली – चंद्रकांत पाटील
• सांगली – चंद्रकांत पाटील
• वाशिम – हसन मुश्रीफ
• पालघर – गणेश नाईक
• नाशिक – गिरीश महाजन
• जळगाव – गुलाबराव पाटील
• मुंबई उपनगर – ॲड. आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा (सह-पालकमंत्री)
• यवतमाळ – संजय राठोड
• धुळे – जयकुमार रावल
• रत्नागिरी – उदय सामंत
• जालना – पंकजा मुंडे
• चंद्रपूर – अशोक उईके
• नांदेड – अतुल सावे
• सातारा – शंभूराज देसाई
• लातूर – शिवेंद्रसिंह भोसले
• रायगड – आदिती तटकरे
• नंदुरबार – माणिकराव कोकाटे
• हिंगोली – नरहरी झिरवाळ
• सोलापूर – जयकुमार गोरे
• भंडारा – संजय सावकारे
• धाराशिव – प्रताप सरनाईक
• छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
• बुलढाणा – मकरंद जाधव
• अकोला – आकाश फुंडकर
• सिंधुदुर्ग – नितेश राणे
• गोंदिया – बाबासाहेब पाटील
• गडचिरोली – ॲड. आशिष जयस्वाल (सह-पालकमंत्री)
• कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ (सह-पालकमंत्री)
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या योजने बद्दल दिली मोठी उपडेट
लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी उपडेट समोर येत आहे. लाडक्या बहिणींना धक्का बसण्याची शक्यता. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजने बद्दल मोठी माहिती दिली आहे. राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखा पेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक हातभार लागावा यासाठी हि योजना सरकारने चालू केली होती. परंतु आता या योजनेतून काही महिलांना वगळले जाऊ शकते. या योजनेतील ज्या महिलांचे अर्ज पात्र झाले आहेत अशा महिलांना डिसेंबर महिन्या पर्यंतचे सहा हप्त्याचे पंधराशे रुपये महिन्या प्रमाणे सर्व पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत.
पहा काय म्हणाल्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे!
मुख्यामंत्री लाडकी बहीण योजने बाबत पाच प्रकारच्या तक्रारी ह्या महिला व बालकल्याण विभागाकडे आल्या आहेत. वेगवेगळ्या बाजुने आम्ही या तक्रारीची पडताळणी करणार आहोत. त्यातील काही तक्रारी या स्थानिक प्रशासनाकडून आलेल्या आहेत, तर काही लाभार्थी महिलांनी पत्र लिहून या योजनेसाठी आता आम्ही पात्र नसल्याची माहिती दिली आहे. तक्रारी प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची पडताळणी होणार आहे. मात्र लाडकी बहीण योजनेच्या मूळ जीआर मध्ये कोणताही बदल होणार नाही असे मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
पहा कोण कोणत्या अर्जाची होणार पडताळणी?
चार चाकी वाहनं असलेल्या महिलांच्या अर्जांची होणार पडताळणी.
ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तरी देखील या योजनेचा फायदा घेत आहेत अशा अर्जांची होणार छाननी.
एकच महिलेने दोन अर्ज दाखल केले आहेत अशा अर्जांची होणार छाननी.
लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जांची होणार पडताळणी.
आधार कार्डवर आणि कागद पत्रावर नावांमध्ये तफावत असलेल्या अर्जाची देखील पडताळणी होणार अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
तसेच अर्ज पडताळणी मध्ये ज्या लाभार्थी महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, किंवा त्यांच्या कडे चारचाकी वाहनं आहेत, अशा महिलांना आता या योजनेतून वगळलं जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याचा फटका हा राज्यातील अनेक लाडक्या बहिणींना बसू शकतो.
महायुती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात महिलांसाठी लाडकी बहिण योजना सरू केली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना १५०० रुपये महिन्या प्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महिलांच्या खात्यात पाच हप्ते जमा झाले. त्यानंतर विधानसभा निवडणूक लागली आणि या योजनेचा फायदा महायुतीला झाला राज्यामध्ये बहुमतात महायुतीचे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे. व अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले व त्या नंतर ३३ कॅबिनेट तर ६ राज्यमंत्र्यांच्या शपथविधी देखील झाला परंतु अद्याप खाते वाटप झाली नाही.
महायुतीच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना ₹१५००/- ऐवजी ₹२१००/- असा उल्लेख आहे. परंतु लाडक्या बहिणीला पुढचा म्हणजेच डिसेंबर चा सहावा हप्ता अद्याप पर्यंत मिळाला नाही. तसेच सोशल मीडिया अनेक बातम्या फिरत आहेत की, लाडक्या बहिण योजनेचे निकष किंवा अटी बदलणार, लाडकी बहिण योजना बंद होणार अशा प्रकारच्या अनेक बातम्या ऐकून लाडक्या बहिणी संभ्रमात पडल्या आहेत की या योजनेचे काय होणार.? पण या योजने बद्दल स्वतः मुख्यमंत्री काय बोलले ते आपण पाहुयात.
नागपूर येथे सुरू असलेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उत्तर देताना लाडकी बहीण योजनेबद्दल स्पष्टच सांगून टाकल आहे की ही योजना बंद होऊ देणार नसून त्या योजनेचा डिसेंबर महिन्याचा म्हणजेच सहावा हप्ता हे अधिवेशन संपताच महिलांच्या खात्यात जमा करणार आहोत.
दिवसेंदिवस विजेची वाढती मागणी पाहता सरकारने वीज उत्पादनाची वेगवेगळे पर्याय शोधले असून सद्या सौर ऊर्जेच्या वापरावर भर देण्यात आला आहे त्या साठी सरकार अनुदान देत आहे. सौर उर्जेचे महत्व लक्षात घेता राज्य सरकार कडून महाराष्ट्रात २०१५ पासून शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंपाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. यापूर्वी अटल शेतकरी कृषी सौर पंप योजना तसेच मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना राबविण्यात आल्या होत्या, तसेच प्रधानमंत्री कुसुम घटक ब या योजनेअंतर्गत राज्यात ९ सप्टेंबर २०२४ पर्यंत २ लाख ६३ हजार १५६ कृषी सौर पंप बसवण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांना या सौर पंपाचा मिळालेला लाभ तसेच शेतकऱ्यांचा या सौर पंपा बाबतचा प्रतिसाद लक्षात घेता मागेल त्याला सौर पंप देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
➧ या शेतकऱ्यांना मिळेल प्राधान्य
महाराष्ट्र राज्य सरकारने २०२४ च्या अर्थसंकल्पात मागेल त्याला कृषी सौर पंप या योजनेची घोषणा केली असून या अंतर्गत राज्यातील जवळपास आठ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना कृषी सोलर पंप देण्याचा मानस सरकारचा आहे. या अगोदर पीएम कुसुम अंतर्गत ही योजना राबविण्यात येत होती. परंतु सध्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात या सौर कृषी पंपाची मागणी होताना दिसून येत आहे. परंतु ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्रोत आहे किंवा ज्या शेतकऱ्याकडे सिंचना करीता पारंपरिक पद्धतीचा वीज पुरवठा नाही अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला कृषी सौर पंप योजना राबविण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्याने यापूर्वी महावितरण कडे पैसे भरून कृषी सौर पंप मिळालेला नाही अशा प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
➧ असा करावा अर्ज
मागेल त्याला कृषी सौर पंप या योजनेचा अर्ज करण्यासाठी महावितरण तर्फे स्वतंत्र वेब पोर्टल तयार केले आहे. त्या वेब पोर्टल वर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index.php या वेबपोर्टलवर गेल्यानंतर लाभार्थी सुविधा या पर्यायावर जाणे व नंतर अर्ज करा या पर्यायावर गेल्यानंतर अर्ज ओपन होईल तो अर्ज संपूर्ण भरावा व आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करावीत व नंतर अर्ज सबमिट करावा.
➧ लागणारी आवश्यक कागदपत्र
➤ आधार कार्ड ➤ ७/१२ उतारा ➤ जात प्रमाणपत्र ( अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांसाठी ) ➤ अर्जदार स्वतः शेतजमिनीचा मालक एकटा नसेल तर इतर हिस्सेदारांचा/मालकांचा नाहरकत दाखला देणे आवश्यक आहे. ➤ पाण्याचा स्त्रोत डार्क झोनमध्ये असल्यास भुजल सर्वेक्षण विभागा मार्फत ना हरकत प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. ➤ संपर्कासाठी मोबाईल क्रमांक. ईमेल (असल्यास) ➤ पाण्याची खोली व त्याची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे.
राज्य सरकारच ठरलं या दिवशी वितरित होणार तिसरा हप्ता. याबाबत अदिती तटकरे यांनी दिली माहिती. Mukhyamatri Mazi Ladki Bahin Yojna
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण हे येत्या २९ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे. अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. या योजनेस पात्र असणाऱ्या महिलांना प्रतीमहा पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ज्या महिलांना मागील दोन हप्ते मिळालेले आहेत त्यांना तिसऱ्या हप्त्याचे पंधराशे रुपये मिळणार तर ज्या महिलांना आणखीन पैसे मिळालेले नाहीत त्यांना तिन्हीही हप्त्याने एकत्रित रुपये चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत.
राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या.
राज्य सरकारच्या या निर्णया बाबत राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा होणारा तिसरा कार्यक्रम २९ सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार असून हा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जाचा लाभ हा लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. अनेक महिलांना अर्जात त्रुटी राहिल्यामुळे अद्याप पर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या तिसऱ्या हप्त्यात अशा महिलांना लाभ दिला जाणार आहे. या तिसऱ्या हप्त्यात एकूण दोन कोटी महिलांना लाभ देण्यात येईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.