MMLBY पहा लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार?

लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीये पर्यंत होणार महिलांच्या खात्यात जमा?

सध्या महाराष्ट्र मध्ये लाडकी बहिणी योजना (Mukhyamantri Ladki Bahin Yojna) चर्चेत असून या योजनेचा दहावा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता हा आणखीन महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या नसून लाभार्थी महिला भगिनी या हप्त्याची वाट चातकासारखी पाहताना दिसून येत आहेत. खरं पाहता एप्रिल महिन्याचा हा शेवटचा आठवडा आहे. तरी देखील आणखीन लाभार्थी महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झालेले नाहीत.

एप्रिल महिन्याचा लाडक्या बहिणीचा पंधराशे रुपये हप्ता हा लवकरात लवकर म्हणजेच अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर 30 तारखेच्या अगोदर लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती महिला व बाल विकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.?

विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणी योजनेची अर्ज पडताळणी चालू केलेली असून आणखीनही चालूच आहे. या योजनेच्या निकषांनुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. जसेकी ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार पेक्षा अधिक आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच पात्र महिलांच्या खात्यावर हे पंधराशे रुपये जमा होणार आहेत.

Ration Card KYC रेशन कार्ड केवायसी करण्याची शेवटची तारीख. पहा कोणती आहे?

रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी. रेशनकार्ड ई-केवायसी करण्यासाठी मिळाली मुदत वाढ. ही अंतिम मुदतवाढ असल्याचा दावा?

Ration Card KYC रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ई-केवायसी करण्यासाठी रेशन कार्ड धारकास ही शेवटची संधी असल्याचे सांगितले जात आहे? या आधी रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत ही ३१ मार्च २०२५ ही होती परंतु आता याला एक महिन्याची मुदत वाढ मिळाली असून ३० एप्रिल २०२५ पर्यंत ई-केवायसी करू शकता.

आता केलेली मुदतवाढ ही चौथ्यांदा केलेली मुदतवाढ आहे. असे विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ही शेवटची मुदतवाढ असल्याचे सांगितले जात आहे? यानंतर रेशन कार्ड केवायसी करण्याकरिता मुदतवाढ मिळणार नसून 30 एप्रिल पर्यंत सर्व रेशन कार्डधारकांनी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.

MMLBY लाडक्या बहिणींना फेब्रुवारी चा हप्ता आठ दिवसात मिळणार?

स्वतः उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले!

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. (mukhyamantri ladki bahin yojna February 2025) फेब्रुवारी महिन्याचा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा हप्ता अद्याप पर्यंत महिलांच्या खात्यावर जमा झालेला नाही. सर्व लाभार्थी महिलांना आनंदाची बातमी आज स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

आज जालना जिल्ह्यातील परतूर येतील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलताना म्हणाले की, महिला व बालविकास खात हे आमच्या आदिती तटकरे यांच्या कडे आहे. त्यांनी या योजने मध्ये खास लक्ष घातले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली तेव्हापासून या योजने मुळे आमच्यावर भरपूर टीका झाली. आज हेच मीडिया वाले सांगतात की ही योजना बंद होणार?. परंतू आम्ही शब्दाचे पक्के आहोत. आम्ही दिलेला शब्द पाळतो. ही योजना बंद होणार नाही. कालच मी या योजनेसाठी लागणाऱ्या रकमेसाठी मंजुरी दिली आहे. आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा पंधराशे रुपये हप्ता हा आठ दिवसामध्ये सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे असे सांगितले.

a white hand with a black background
1693414770721 1

Guardian Minister कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री? पहा संपूर्ण यादी!

.

महायुती सरकार मधील पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला. राज्यातील नवीन सरकारकडून नुकतीच पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीची पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वतः कडे घेतली आहे तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पुण्यासह सद्या चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्याकडे मुंबई शहरासह ठाण्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे.

पालकमंत्री पदाची संपूर्ण यादी

• गडचिरोली – देवेंद्र फडणवीस

• मुंबई शहर व ठाणे – एकनाथ शिंदे

• पुणे व बीड – अजित पवार

• नागपूर व अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे

• अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे

• सांगली – चंद्रकांत पाटील

• सांगली – चंद्रकांत पाटील

• वाशिम – हसन मुश्रीफ

• पालघर – गणेश नाईक

• नाशिक – गिरीश महाजन

• जळगाव – गुलाबराव पाटील

• मुंबई उपनगर – ॲड. आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा (सह-पालकमंत्री)

• यवतमाळ – संजय राठोड

• धुळे – जयकुमार रावल

• रत्नागिरी – उदय सामंत

• जालना – पंकजा मुंडे

• चंद्रपूर – अशोक उईके

• नांदेड – अतुल सावे

• सातारा – शंभूराज देसाई

• लातूर – शिवेंद्रसिंह भोसले

• रायगड – आदिती तटकरे

• नंदुरबार – माणिकराव कोकाटे

• हिंगोली – नरहरी झिरवाळ

• सोलापूर – जयकुमार गोरे

• भंडारा – संजय सावकारे

• धाराशिव – प्रताप सरनाईक

• छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट

• बुलढाणा – मकरंद जाधव

• अकोला – आकाश फुंडकर

• सिंधुदुर्ग – नितेश राणे

• गोंदिया – बाबासाहेब पाटील

• गडचिरोली – ॲड. आशिष जयस्वाल (सह-पालकमंत्री)

• कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ (सह-पालकमंत्री)

• परभणी – मेघना बोर्डीकर

• वर्धा – डॉ. पंकज भोयर

a white hand with a black background
1693414770721 1

MLBY लाडक्या बहिणीच्या तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरली!पहा कधी मिळणार चार हजार पाचशे रुपये!

राज्य सरकारच ठरलं या दिवशी वितरित होणार तिसरा हप्ता. याबाबत अदिती तटकरे यांनी दिली माहिती. Mukhyamatri Mazi Ladki Bahin Yojna

WhatsApp Image 2024 09 24 at 12.27.18 PM

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण हे येत्या २९ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे. अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. या योजनेस पात्र असणाऱ्या महिलांना प्रतीमहा पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ज्या महिलांना मागील दोन हप्ते मिळालेले आहेत त्यांना तिसऱ्या हप्त्याचे पंधराशे रुपये मिळणार तर ज्या महिलांना आणखीन पैसे मिळालेले नाहीत त्यांना तिन्हीही हप्त्याने एकत्रित रुपये चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत.

राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या.

राज्य सरकारच्या या निर्णया बाबत राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा होणारा तिसरा कार्यक्रम २९ सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार असून हा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जाचा लाभ हा लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. अनेक महिलांना अर्जात त्रुटी राहिल्यामुळे अद्याप पर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या तिसऱ्या हप्त्यात अशा महिलांना लाभ दिला जाणार आहे. या तिसऱ्या हप्त्यात एकूण दोन कोटी महिलांना लाभ देण्यात येईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. 

click here
1693414770721

.

MH Govt MYD मुख्यमंत्री योजनादूत च्या माध्यमातून ५०००० जागांची महा भरती?

या योजनेच्या माध्यमातून पन्नास हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार?

1000837539

MH Govt MYD मुख्यमंत्री योजनादूत च्या माध्यमातून ५०००० जागांची महा भरती?

(Mukhyamantri Yojana Doot) महाराष्ट्र राज्य सरकारने लाडकी बहीण योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना, अशा अनेक योजनांच्या नंतर आणखीन एक भन्नाट योजना महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पन्नास हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शासकीय योजना घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच त्याचा प्रसार, प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार ५०००० योजनादूत ची नियुक्ती करणार आहे. यासाठी सरकारी तिजोरी मधून ३०० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. ही नियुक्ती ही सहा महिन्याच्या कालावधी साठी असणार आहेत, तसेच प्रत्येकाला १००००/- रुपये मानधन देण्यात येणार आहे. चला तर मग पाहूया योजना दूत साठी अर्ज करण्यास काय आहे पात्रता व काय कागदपत्र लागतील.

➧ मुख्यमंत्री योजनादूत निवडीसाठी पात्रता.

➤ वयोमर्यादा – १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार यासाठी पात्र असतील.
➤ शैक्षणिक अर्हता – उमेदवार कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.
➤ उमेदवारास संगणक ज्ञान आवश्यक आहे.
➤ उमेदवाराकडे अदययावत मोबाईल असणे आवश्यक आहे.
➤ उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक आहे.
➤ उमेदवारांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
➤ उमेदवाराच्या नावे बँक खाते हे आधारसंलग्न असणे आवश्यक आहे.

.

➧ योजनादूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रे.

➤ विहित नमुन्यातील “मुख्यमंत्री योजनादूत” कार्यक्रमासाठी ऑनलाईन केलेला अर्ज.
➤ आधार कार्ड.
➤ पदवी उत्तीर्ण असल्या बाबतचा पुराव्या दाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ.
➤ उमेदवाराचा मोबाईल क्रमांक.
➤ उमेदवाराचा ईमेल आयडी.
➤ उमेदवाराचा बँक खात्याचा तपशील.
➤ उमेदवारचा महाराष्ट्राराज्याचा अधिवासाचा दाखल.(सक्षम यंत्रणेने दिलेला).
➤ हमीपत्र.(ऑनलाइन अर्जाबरोबर च्या नमुन्यामधील)
➤ पासपोर्ट आकाराचा फोटो.

.

➧ मुख्यमंत्री योजनादूत ची पहा कशी असणार निवड प्रक्रिया?

उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया ही माहिती व जनसंपर्क महासंचालनालया द्वारे व नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्था मार्फत ऑनलाईन रीत्या पूर्ण करण्यात येणार आहे. सदरची छाननी ही उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषावर करण्यात येईल. तसेच ऑनलाईन रीत्या प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्या कडे पाठविण्यात येणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहायक आयुक्त व कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जां संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करतील. (यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक व वयोमर्यादे विषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत.) त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर ६ महिन्याचा करार केला जाणार आहे. कराराचा कालावधी वाढविला जाणार नाही. जिल्हा माहिती अधिकारी वरील प्रमाणे शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात पात्र उमेदवारांचे समुपदेशन व निर्देशन करणार आहेत. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहायक आयुक्त, (कौशल्य विकास रोजगार) व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी १ व शहरी भागात ५ हजार लोकसंख्येसाठी १ या प्रमाणात उमेदवारांना योजनादूत म्हणून रुजू करनार आहेत. मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून ग्रहया धरण्यात येणार नाही. या नेमणूकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी किंवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवारांकडून घेण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री योजनादूत भरतीचा GR इथे पहायेथे क्लिक करा
click here
1693414770721

RTE प्रवेशासाठी मिळाली मुदतवाढ!

1000811536

RTE प्रवेशासाठी मिळाली मुदतवाढ!

शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत (RTE) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला दि.३१ जुलै २०२४ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. परंतु काही पालक आणि संघटनांनी जास्तीचा वेळ वाढून मागितल्या मुळे ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे अद्याप प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे.

पाच ऑगस्टपर्यंत मुदतवाढी बाबतची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी परिपत्रका द्वारे दिली आहे. शिक्षण विभागाने फेब्रुवारी मध्ये RTE प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलांमुळे न्यायालयीन प्रकरण समोर आले होते. शिक्षण विभागाने केलेला बदल हा न्यायालयाने घटनाबाह्य असल्याचे सांगितले. त्यामुळे शिक्षण विभागाला पूर्वीप्रमाणेच RTE प्रवेश प्रक्रिया राबवावी लागली आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुमारे दोन महिने चालल्याने या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला.

या वर्षी राज्यातील ९ हजार २१७ शाळां मध्ये १ लाख ५ हजार २४२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. त्यासाठी दाखल झालेल्या २ लाख ४२ हजार ५१६ प्रवेश अर्जां मधून ९३ हजार ९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याचे जाहीर झाले. तसेच प्रतीक्षा यादीत ७१ हजार २७६ विद्यार्थी आहेत. शिक्षण विभागाने प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चिती साठी २३ जुलै ते ३१ जुलै पर्यंतची मुदत दिलेली होती. ही मुदत बुधवारी ३१ जुलैला संपली आहे. मात्र या मुदतीत ३९ हजार ४०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला होता. या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ मिळाल्याने अद्याप प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेश घेण्यासाठी आणखीन पाच दिवसाचा वेळ मिळाला आहे.

click here
1693414770721

Toll Tax टोलनाके बंद होणार?

वाहन धारकांसाठी महत्वाची बातमी Satellite Based Toll Collection System

1000802637

Satellite Based Toll Collection System पहा सॅटेलाईट बेस्ड टोल कलेक्शन प्रणाली काय आहे.

सद्या सर्वत्र आपणास पाहायला मिळत आहे की, FasTag ची सुविधा शंभर टक्के वाहन धारकाकडे असून देखील टोल नाक्यावर रांग लावण्याची वेळ पडत आहे. टोल नाक्यावर जास्तीचा वेळ जात आहे. तसेच काही वेळेस FasTag मध्ये बॅलन्स असून देखील कार्ड स्कॅन न झाल्यास किंवा बॅलन्स संपलेला असल्यास अनेक वेळेस वाद विवाद होताना आपणास पाहायला मिळत आहेत. आता हे सर्व बंद होणार असून आता या पुढे टोल नाक्यावर थांबण्याची गरज नाही कारण केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आता नवीन सॅटेलाईट आधारित टोल वसुलीची घोषणा केली आहे. वाहन धारकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. चला तर जाणून घेऊया की सॅटेलाईट आधारित टोल वसुली प्रणाली काय आहे?
ही कशी काम करेल व थेट वाहन धारकांच्या बँक खात्यातून पैसे कसे कापले जातील. चला तर मग पाहूया.

सॅटेलाईट बेस्ड टोल कलेक्शन प्रणाली काय आहे?

सध्या वाहन धारकाला टोल भरण्यासाठी टोल नाक्यावर थांबावे लागत आहे तसेच कधी कधी टोल नाक्यावर ट्राफिक जाम देखील लागत आहे. FasTag आल्यापासून मनुष्यबळ कमी लागत आहे तसाच पहिल्यापेक्षा वेळ देखील कमी लागत आहे परंतु सर्व्हर डाऊन असल्यास ट्राफिक जामची समस्या कायम आहे. आता सॅटेलाइट बेस्ड टोल कलेक्शन प्रणाली मध्ये टोल कारमध्ये लावलेल्या ट्रॅकिंग सिस्टीम द्वारेच वसूल केला जाणार आहे. यासाठी सॅटेलाइट स्वत:च कारच्या निश्चित केलेल्या अंतराची गणना करेल आणि त्यानुसार टोल वसूल केला जाईल. या सिस्टीमला सॅटेलाइट बेस्ड टोल कलेक्शन प्रणाली किंवा GPS बेस्ड टोल कलेक्शन सिस्टीम असे म्हणतात.

ही प्रणाली कशी काम करेल?

सॅटेलाईट बेस्ड टोल कलेक्शन प्रणाली ही कारमध्ये लावलेल्या OBU (ON BOARD UNIT) च्या मदतीने काम करणार आहे. या OBU च्या मदतीने सॅटेलाईट कारच्या ठरवलेल्या अंतराचा मागोवा घेईल व या नवीन प्रणाली साठी कारमध्ये OBU बसवावा लागणार आहे. हे OBU कारची सर्व माहिती गोळा करेल, आणि हायवेवर लावलेल्या कॅमेर्‍यांनी सॅटेलाइट सोबत शेअर करेल, ज्यामुळे सॅटेलाइट द्वारेच टोल वसूल केला जाईल. या प्रणाली मध्ये तुम्हाला OBU सोबत जोडलेल्या वॉलेटमध्ये पैसे ठेवावे लागणार आहेत. सध्या कारमध्ये OBU उपलब्ध नाहीत. त्याला बाजारातून घेऊन बसवावे लागणार आहे. असे म्हंनले जात आहे की, ही प्रणाली चालू झाल्यानंतर कारमध्ये OBU आधीपासूनच बसवलेले असतील.

काय फायदा होईल या प्रणालीचा

देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दावा केला आहे की, संपूर्ण जगात ही पहिलीच टोल कलेक्शन प्रणाली आहे. ज्यामध्ये GPS बेस्ड तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. नवीन टोल कलेक्शन प्रणाली लागू झाल्या नंतर वाहन चालकांना टोल नाक्यावर थांबावे लागणार नाही. त्यामुळे हायवेवर जाम लागणार नाही. व वाहन धारकांचा वेळ वाया जाणार नाही. असे म्हणले जात आहे की, या प्रणालीमुळे प्रवास आणखी सोपा होणार आहे.

click here
1693414770721