Solar Krushi Pump मागेल त्याला सौर पंप योजनेचा अर्ज इथे व असा भरा!

WhatsApp Image 2024 09 25 at 1.49.01 PM

दिवसेंदिवस विजेची वाढती मागणी पाहता सरकारने वीज उत्पादनाची वेगवेगळे पर्याय शोधले असून सद्या सौर ऊर्जेच्या वापरावर भर देण्यात आला आहे त्या साठी सरकार अनुदान देत आहे. सौर उर्जेचे महत्व लक्षात घेता राज्य सरकार कडून महाराष्ट्रात २०१५ पासून शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंपाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. यापूर्वी अटल शेतकरी कृषी सौर पंप योजना तसेच मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना राबविण्यात आल्या होत्या, तसेच प्रधानमंत्री कुसुम घटक ब या योजनेअंतर्गत राज्यात ९ सप्टेंबर २०२४ पर्यंत २ लाख ६३ हजार १५६ कृषी सौर पंप बसवण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांना या सौर पंपाचा मिळालेला लाभ तसेच शेतकऱ्यांचा या सौर पंपा बाबतचा प्रतिसाद लक्षात घेता मागेल त्याला सौर पंप देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

➧ या शेतकऱ्यांना मिळेल प्राधान्य

महाराष्ट्र राज्य सरकारने २०२४ च्या अर्थसंकल्पात मागेल त्याला कृषी सौर पंप या योजनेची घोषणा केली असून या अंतर्गत राज्यातील जवळपास आठ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना कृषी सोलर पंप देण्याचा मानस सरकारचा आहे. या अगोदर पीएम कुसुम अंतर्गत ही योजना राबविण्यात येत होती. परंतु सध्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात या सौर कृषी पंपाची मागणी होताना दिसून येत आहे. परंतु ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्रोत आहे किंवा ज्या शेतकऱ्याकडे सिंचना करीता पारंपरिक पद्धतीचा वीज पुरवठा नाही अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला कृषी सौर पंप योजना राबविण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्याने यापूर्वी महावितरण कडे पैसे भरून कृषी सौर पंप मिळालेला नाही अशा प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

➧ असा करावा अर्ज

मागेल त्याला कृषी सौर पंप या योजनेचा अर्ज करण्यासाठी महावितरण तर्फे स्वतंत्र वेब पोर्टल तयार केले आहे. त्या वेब पोर्टल वर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index.php या वेबपोर्टलवर गेल्यानंतर लाभार्थी सुविधा या पर्यायावर जाणे व नंतर अर्ज करा या पर्यायावर गेल्यानंतर अर्ज ओपन होईल तो अर्ज संपूर्ण भरावा व आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करावीत व नंतर अर्ज सबमिट करावा.

➧ लागणारी आवश्यक कागदपत्र

➤ आधार कार्ड
➤ ७/१२ उतारा
➤ जात प्रमाणपत्र ( अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांसाठी )
➤ अर्जदार स्वतः शेतजमिनीचा मालक एकटा नसेल तर इतर हिस्सेदारांचा/मालकांचा नाहरकत दाखला देणे आवश्यक आहे.
➤ पाण्याचा स्त्रोत डार्क झोनमध्ये असल्यास भुजल सर्वेक्षण विभागा मार्फत ना हरकत प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
➤ संपर्कासाठी मोबाईल क्रमांक. ईमेल (असल्यास)
➤ पाण्याची खोली व त्याची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे.

click here
1693414770721

PMFBY राज्यातील शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी! पीक नुकसान भरपाई मिळवण्यासाठी करा हे काम!

WhatsApp Image 2024 09 02 at 5.57.06 PM

सद्या सर्वत्र पावसाने थैमान घातलेले असून अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेले आहे. काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य परिस्थिती पाहायला मिळली आहे. अनेक ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झालेली आहे. या होणाऱ्या अतिवृष्टी मुळे पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. या होणाऱ्या नुकसानी मुळे शेतकरी राजा चिंता व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्याने पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्याने पिकाची नुकसान भरपाई साठी तक्रार करणे गरजेचे आहे. चला तर मग आपण पाहूया नुकसानी बद्दल कशी ऑनलाईन तक्रार करायची.

सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण खरीप हंगामातील पीक विमा भरला असेल आणि आपल्या पिकाचे नुकसान जास्तीच्या पावसामुळे झाले असेल तर हे काम करा. आपणास पीक नुकसानीची पुर्वसचना ही पिकाचे नुकसान झाल्यापासून ७२ तासाच्या आत (३ दिवसाच्या आत) देणे गरजेचे आहे. त्यामुळे पीक नुकसानीची पूर्व सूचना अगोदर देणे गरजेचे आहे. पुर्वसुचना उशिरा दिल्यास सदरची पुर्वसचना ग्राह्य धरली जानार नाही. त्यासाठी आपणास दोन पर्याय आहे एक म्हणजे १४४४७ या toll-free नंबर वर कॉल करून देणे किंवा दुसरा म्हणजे Crop insurance या ॲप वरून द्यावी. पूर्व सूचना दिल्याशिवाय स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकांतर्गत विमा मिळत नाही. तसेच पूर्वसूचना देताना १) Excess rainfall (अतिवृष्टी), २) Inundation ( पूर ), ३) Heavy rainfall (मुसळधार पाऊस) या पैकी पर्याय निवडून पूर्व सूचना द्यावी.

१) कुणीही कीड व रोगासाठी पुर्वसूचना देऊ नये. अशा पूर्व सूचना विमा कंपनी मार्फत रद्द होतात.

२) यावर्षीपासून पिकाच्या कोणत्याही वाढीच्या अवस्थेत पूर्व सूचना दिल्यास नुकसान भरपाई ही  पिक कोणत्या वाढीच्या अवस्थेत आहे हा विचार न करता पिकाचे नुकसान किती टक्के झाले यानुसार नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामुळे वाढीच्या अंतिम अवस्थेची वाट न बघता  नुकसान झाले त्यावेळेस तात्काळ पुर्वसुचना द्यावी.

३) पूर्व सूचना दिल्यानंतर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या  Docket Id सांभाळून ठेवावा किंवा पीक विमा पावती वर लिहून ठेवावा.

click here
1693414770721

agriculture बॅटरी स्वयंचलित फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज भरा!

1000823103

agriculture battery sprayer pump बॅटरी स्वयंचलित फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज भरा!

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच आर्थिक प्रगती होण्यासाठी सरकार कडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. शेतकऱ्याला शेतीमध्ये काम करत असताना अनेक अवजारांची आवश्यकता पडत असते. अवजारे जर स्वतःचे नसतील तर त्यांना ती भाड्याने आणण्यासाठी आर्थिक झळ सोसावी लागते. तसेच शेती अवजारे विकत घेण्याची परिस्थिती नसते. या सर्व बाबींचा सारासार विचार करून सरकार शेतकऱ्यांसाठी अनुदानित तत्वावर अवजारे उपलब्ध करून देत आहे.

Maha DBT च्या माध्यमातून महाराष्ट्रभर राज्य सरकार हे शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवून अनुदान देत आहे. अशीच एक योजना म्हणजे शेतकऱ्यांना शेतातील पीक फवारणीसाठी लागणारा फवारणी पंप जवळजवळ 50 टक्के अनुदानावर मिळणार आहे.

बॅटरी स्वयंचलित फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज Maha DBT ( https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login ) या संकेतस्थळावर भरावे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पुढील कागदपत्र लागतील अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याचे आधार कार्ड. अर्जदार शेतकऱ्याचे रहिवाशी प्रमाणपत्र. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे बॅक तपशील म्हणजे बँक पासबुकची प्रत. अर्जदार शेतकऱ्याचे जात प्रमाणपत्र. ( SC, ST, साठी लागू असल्यास.) अर्जदाराचे मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असणारा.

फवारणी पंपासाठी अर्ज कसा करावा?

शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना अनुदानावर फवारणी पंप उपलब्ध करून देण्यासाठी वेळोवेळी अर्ज मागविण्यात येतात. राज्य सरकार कृषी यंत्र योजने अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर फवारणी यंत्रासाठी अर्ज मागवतात. यामध्ये अर्जकरून शेतकरी बांधव फवारणी यंत्रासाठी अनुदानाचा लाभ घेऊ शकतात.

  • MAHA DBT या संकेतस्थळावर जाऊन अगोदर लॉगिन करा.
  • अर्ज करा वर क्लिक करा. नंतर नवीन पेज ओपन होईल.
  • कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडा वर क्लिक करा.
  • मुख्य घटक निवडा व कृषी यंत्र अवजराच्या खरेदीसाठी अर्थ सहाय्य प्रकार निवडा.
  • नंतर तपशील निवडा मध्ये मनुष्यचलीत औजारे हा प्रकार निवडा.
  • यंत्रसामग्री अवजारे व उपकरणे यावर क्लिक करा. नंतर पीक संरक्षण अवजारे निवडा.
  • नंतर खाली मशीनचा प्रकार यामध्ये बरेचसे पंपांचे प्रकार दिलेले आहेत त्यापैकी एक पंप निवडा.
  • व नंतर नियम अटीवर क्लिक करा आणि अर्ज सबमिट करा व नंतर चलन भरा.
click here
1693414770721

PMFBY राज्यातील शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी ! पीक विमा भरण्यास मुदत वाढली ?

1000754833

राज्यातील शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी ! पीक विमा भरण्यास मुदत वाढली ?

राज्यातील शेतकऱ्यासाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम २०२४ साठी पीक विमा भरण्यास दिनांक १८ जून पासून सुरुवात झाली होती. या वर्षीचा पीक विमा भरण्याची अंतिम तारीख ही १५ जुलै २०२४ होती परंतु शेतकऱ्याला या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन राज्य सरकारने ऑनलाइन विमा अर्ज भरण्यास दिनांक ३१/०७/२०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. खरीप हंगाम २०२४ चा पीक विमा भरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य सरकारने ही मुदतवाढ दिली आहे तसेच या वर्षी शेतकऱ्यांना विमा भरण्यासाठी अवघा एक रुपया इतकेच मूल्य लागणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंढे यांनी दिली आहे. गेल्या वर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून १ कोटी ७० लक्ष पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरून या योजनेचा लाभ घेतला. शेतकऱ्यांनी आपला पीक विमा पॉलिसी या तारखेच्या अगोदर भरून घ्यावे असे आवाहन शेतकऱ्यांना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंढे यांनी केले आहे.

पीक विमा योजनेत खालील चौदा पिकांचा समावेश आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२४ अंतर्गत ज्वारी, भात, सोयाबीन, तुर, मुग, कापूस, बाजरी, उडीद, मका, भुईमूग, नाचणी, तीळ, कांदा, कारले ही चौदा पीक या विमा योजनेत सहभागी करण्यात आली आहेत.

कोणत्या पिकाची किती मिळणार नुकसान भरपाई?

सर्वसाधारण पणे पिक निहाय विमा संरक्षण रक्कम यात जिल्हानिहाय फरक संभवतो. पिकासाठी विमा संरक्षित रक्कम हेक्टरी.

भात रु.४०००० ते ५१७६०,
ज्वारी रु.२०००० ते ३२५००,
बाजरी रु १८,००० ते ३३,९१३,
नाचणी रु. १३७५० ते २००००,
मका रु ६००० ते ३५५९८,
तूर रु २५००० ते ३६८०२,
मुग २०००० ते २५८१७,
उडीद रु. २०००० ते २६०२५,
भुईमुग रु. २९००० ते ४२९७१,
सोयाबीन रु. ३१२५० ते ५७२६७,
तीळ रु. २२००० ते २५०००,
कारळे रु. १३७५०,
कापूस रु. २३००० ते ५९९८३,
कांदा रु. ४६००० ते ८१४२२

या योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाईन १४४४७, संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.

click here
1693414770721
1000739030
Oplus_131072