राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महागाई भत्त्यात वाढ!

1000739008

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महागाई भत्त्यात वाढ!

राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत आणि राज्य सरकारकडून सर्व क्षेत्रातील लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आज महाष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी राज्य सरकारने दिली आहे ती म्हणजे महागाई भत्त्यात वाढ केली आहे. महागाई भत्ता हा ४६% वरून ५०% केला आहे. अर्थातच ही वाढ ४% ने केली आहे. तसेच १ जानेवारी २०२४ पासून महागाई भत्याची थकबाकी देखील दिली जाणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय देखील राज्य सरकारने निर्गमित केला आहे. मागील बऱ्याच दिवसापासून महागाई भत्यात वाढ करण्याची मागणी प्रलंबित होती, परंतु आज ती मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्त्यात वाढ दिली जाते. यापूर्वी सप्टेंबर २०२३ मध्ये राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात चार टक्क्याने वाढ केली होती त्यानंतर आज १० जुलै २०२४ रोजी पुन्हा एकदा ४% वाढ महागाई भत्त्यात केली आहे.

राज्य सरकारच्या शासन निर्णयात म्हटले आहे की राज्य सरकारी कर्मचारी आणि इतर पात्र पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांना मान्य असलेल्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न सरकारच्या विचाराधीन आहे. त्यानंतर, शासनाने १ जानेवारी २०२४ पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील स्वीकार्य महागाई भत्त्याचा दर ४६% वरून ५०% पर्यंत वाढवण्याचे आदेश दिले आहेत. १ जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४ या कालावधीतील थकबाकी सह जुलै २०२४ च्या पगारात ही महागाई भत्याची वाढ रोखीने देण्यात यावी. (DA update news)

राज्य सरकारच्या पेन्शन धारकांनाही महागाई भत्त्यात वाढीचा लाभ मिळणार असून १ जानेवारी पासुन त्यांच्या मूळ पेन्शनच्या एकूण रकमेवर ४% DA वाढ लागू केली जाईल. ही वाढ १ जानेवारी २०२४ पासून थकबाकी सह जुलै २०२४ पेन्शन सह दिली जाईल. मान्यताप्राप्त आणि अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांच्या निवृत्ती वेतन धारकांनाही याचा लाभ मिळणार आहे.

click here
1693414770721
1000739030