RTE २५% जागांसाठी सुधारित शाळा व जागांची नवीन यादी संकेत्थळावर प्रसिद्ध झाली आहे. २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील ९ हजार १३८ शाळांमध्ये १ लाख २ हजार ४३४ जागांवर लवकरच नव्याने प्रवेश प्रक्रिया होणार आहे.
.
RTE २५% जागांसाठी सुधारित प्रवेश प्रक्रिया नव्याने सुरू होणार?
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शालेय शिक्षण विभाग सुमारे दहा ते अकरा वर्षांपासून सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी RTE २५% आरक्षित जागांवर प्रवेश दिला जात आहे. परंतु राज्य शासनाने यावर्षी कायद्यात बदल करून केवळ सरकारी शाळांमध्ये RTE अंतर्गत प्राधान्याने प्रवेश देण्याचे धोरण निश्चित केले. सरकारी शाळा उपलब्ध नसतील तरच खाजगी स्वयंम अर्थसहाय्यीत शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल, अशी नियमावली तयार केली. यावर विविध पालक संघटनांनी आवाज उठवला. त्यात काही संघटनांनी न्यायालया पर्यंत देखील धाव घेतली. त्यावर न्यायालयाने शासनाच्या अधीसूचनेल सूचनेला स्थगिती दिली आहे. राज्य शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यातील RTE २५% आरक्षण जागांच्या प्रवेशा संदर्भात विनाअनुदानित शाळांना वगळण्याबाबत काढलेल्या अधीसूचनेला आवाहन देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली गेली होती. न्यायालयात याबाबत सुनावणी घेण्यात आली त्यात राज्य शासनाने ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेला स्थगिती देण्यात आली आहे.
राज्य शालेय शिक्षण विभागाने उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी RTE २५% ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात सर्वात केली असून RTE संकेतस्थळावर जिल्हा निहाय सुधारित शाळांची व जागांची यादी प्रसिद्ध केली आहे.
नव्याने प्रसिद्ध केलेले या यादीमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी राज्यातील ९ हजार १३८ शाळांमध्ये १ लाख २ हजार ४३४ जागांवर लवकरच काही दिवसामध्ये प्रवेश प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच शिक्षण विभागाकडून जाहीर केले जाणार आहे.
सध्या RTE प्रवेशासाठी अर्ज भरण्याची लिंक बंद आहे. मात्र पालकांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. परंतु अद्याप त्यांची घोषणा झालेली नाही लवकरच त्याबाबतीत घोषणा होईल.
शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तरी पालकांनी या बाबतीत सतर्क राहावे व ज्या पालकांनी पहिले अर्ज . केले होते त्यांना परत नव्याने अर्ज करावे लागणार आहेत.
आरटीई प्रवेशास पात्र सुधारित शाळांची संख्या व प्रवेशासाठी उपलब्ध जागांची आकडेवारी
जिल्हा शाळांची संख्या उपलब्ध जागा
- अहमदनगर 357 3023
- अकोला 196 2010
- अमरावती 231 2369
- छ. संभाजीनगर 573 4441
- भंडारा 91 772
- बीड 246 2065
- बुलढाणा 234 2581
- चंद्रपूर 199 1516
- धुळे 108 1138
- गडचिरोली 66 484
- गोंदिया 132 903
- हिंगोली 113 798
- जळगाव 282 3018
- जालना 301 1920
- कोल्हापूर 324 2990
- लातुर 214 1857
- मुंबई 255 4489
- मुंबई 64 1181
- नागपुर 654 6918
- नांदेड 266 2561
- नंदुरबार 56 423
- नाशिक 428 5272
- धाराशिव 122 1013
- पालघर 265 4773
- परभणी 206 1530
- पुणे 915 15606
- रायगड 264 4008
- रत्नागिरी 97 812
- सांगली 232 1887
- सातारा 222 1826
- सिंधुदुर्घ 45 293
- सोलापूर 296 2515
- ठाणे 639 11309
- वर्धा 126 1214
- वाशीम 109 953
- यवतमाळ 210 1966