शेतकरी मित्रांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती पीक विमा भरताना ह्या चुका होऊ देऊ नका अन्यथा आपल्याला विम्याचे पैसे मिळणार नाहीत?
.
विमा पॉलिसी हा घटक सर्वांच्या जीवनामध्ये एक अविभाज्य भाग बनला आहे. आगीचा विमा, आयुर्विमा, आरोग्य विमा, वाहन विमा, अपघात विमा तसेच पीक विमा असे वेगवेगळ्या विमा पॉलिसी घेणे हे सद्या धकाधकीच्या जीवनात गरजेचे झाले आहे. शेतकरी बांधवांसाठी तर पीक विमा हा अति महत्वता झाला आहे शेतकरी हा पिकाला जीवपाड जपत असतो परंतु विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांनी ही काळजी घेणे आवश्यक आहे.
पीक विमा अर्ज भरताना खालील गोष्टींची काळजी घ्या.
यावर्षी २०२४ ला खरीप पीक विमा भरताना ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड, बँक पासबुक व सातबारा या सर्व कागदपत्रा वरील आपले पूर्ण नाव हे सारखे असले पाहिजे. या कागदपत्रात नावामध्ये थोडाफार बदल हा नसला पाहिजे.
उदाहरणार्थ :- ज्ञानेश्वर – ज्ञानदेव, बाळासाहेब – बाळू, राम – रामराव, महादू – महादेव, रौफ – रउफ, प्रभू – प्रभाकर, सरुबाई – सरस्वती, कासिम – काशिम, चंपाबाई – चंफाबाई असे अनेक उदाहरणे आहेत नावात बदल असल्याचे ज्यांचे नाव, वडिलांचे नाव व आडनाव यामध्ये असे बदल आहेत त्यांनी ते बदल अगोदर दुरुस्त करून घ्यावेत. कारण सर्व कागदपत्रावर सारखे नाव असेल तरच आपला विमा मजूर होणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. तसेच काही शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर आडनाव नाहीत त्यांनी आडनाव टाकून घेणे गरजेचे आहे ते पण जसे आधार कार्ड वर बँक पासबुक वर आहे तसेच असणे आवश्यक आहे.
अगोदर जरी आपल्याला याच नावाने विमा मिळालेला असला तरी आता मिळेल याची खात्री नाही म्हणून अगोदर हे काम करा.