.
महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यामधील केशरी रेशनकार्ड धारकांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मागील वर्षी अत्यंत महत्वाची योजना अमलात आणली असून या योजनेत केशरी रेशनकार्ड धारकांना रेशन वरील धान्य ऐवजी रोख रक्कम DBT बँक खात्यात जमा होत असून ही रक्कम दरमाह प्रती लाभार्थी १५०/- रुपये मिळत आहे. ती आत्ता वाढून मिळणार आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त संभाजीनगर, बीड, जालना, नांदेड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला आणि वर्धा हे चौदा जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना रेशन वरील धान्य ऐवजी रोख रक्कम मिळणार असा जी आर २८ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रसिद्ध झाला होता यामध्ये दरमाह प्रतीव्यक्ती मिळणारी रोख रक्कम ही ₹ १५०/- होती.
परंतु आज दिनांक २० जून २०२४ रोजी निघालेला जी आर (अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन परिपत्रक क्रमांकः अधापु-२०२४/ प्र . क्र. ४६ /नापु- २२ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.) हा दरमाह प्रातिव्यक्ती रू १५०/- वरून वाढवून ही रक्कम आता दरमहा प्रतिव्यक्ती रू १७०/- इतकी करण्यात आली आहे. व ही रक्कम केशरी शिधापत्रिका धारकाच्या बँक खात्यात (DBT) थेट जमा होणार आहे.
आपल्या शिधापत्रिकेत जर पाच नाव असतील तर १७०×५=८५०/- रुपये महिन्याला आपल्या कुटुंब प्रमुखाच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत.