ज्या महिलांनी अर्ज केला नव्हता त्यांच्यासाठी आणखी एक संधी!
Mukhyamantri Ladki Bahin Yojna राज्यात आतापर्यंत २ कोटी ३० लाख महिला भगिनींना त्यांच्या खात्यामध्ये पाच महिन्याचे एकूण सात हजार पाचशे रुपये सरकारकडून जमा करण्यात आले आहेत. व ज्या महिलांना अद्याप पर्यंत लाडकी बहिण योजनेचा अर्ज केलेला नाही अशा महिलांना राज्य सरकारने विजयादशमीच्या पूर्व संधेला आनंदाची बातमी दिली आहे. लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरण्याची मुदत आता राज्य सरकारने १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत वाढवली आहे. मात्र हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविका मार्फतच भरावे लागणार आहेत. अशी सूचना शासनाकडून मिळाली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीला आता नव्याने अर्ज भरण्याची संधी प्राप्त झाली आहे. उर्वरित चार दिवसात अर्ज करून या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
राज्यातील लाडकी बहीण योजनेला मिळणार प्रचंड प्रतिसाद पाहून राज्य सरकारने या योजनेला मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ३० सप्टेंबर ही योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत देली गेली होती. मागील महिन्यातही लाखो महिलांना आपले अर्ज दाखल केले होते. ज्या महिलांनी अर्ज सादर केले होते. त्यांना या योजनेचा लाभही मिळण्यास सुरुवात झाली होती. रक्षाबंधन सणाचा मुहूर्त साधत राज्य सरकारने या योजनेच्या पहिल्या हफ्याच्या वितरणास सुरुवात केली होती. तेव्हापासून आजपर्यंत राज्यातील तब्बल २ कोटी ३० लाख महिला या योजनेत पात्र ठरल्या असून त्यांच्या बँक खात्यावर DBT मार्फत पैसेही जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बहुतांश महिलांच्या बँक खात्यात आत्तापर्यंत पाच हप्त्याने ७५००/- रुपये जमा झाले आहेत. आता उर्वरीत महिलांनाही लाडकी बहीण योजनेसाठी १५ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. मात्र त्यासाठी केवळ अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे.