कोकण, मुंबईसह मध्यमहाराष्ट्र व मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता!
Maharashtra Weather पुढील काही तासात जोरदार पाऊस!
पुढील काही दिवसांत उन्हाळा संपणार असून पावसाळा सुरू होणार आहे, सद्या सूर्य हा आग ओकत असून तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस वाढतच चालला असून अधून मधून वातावरणात बदल झालेला पाहायला मिळत आहे अचानकच पाऊस पण हजेरी लावत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. तर काही भागामध्ये शेतकरी हा पावसाची चातका सारखी वाट पाहत आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजनुसार राज्यामध्ये पुढील काही तासात काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई ठाणेसह कोकणात सद्या जरी उकाडा जाणवत असला तरी पुढील काही तासात पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड, पालघर मध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळतील. मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील ४८ तासा मध्ये काही भागामध्ये तुरळक पाऊस तर काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी लागेल. तर काही भागामध्ये तुरळक होणाऱ्या पावसामुळे नागरिकांची उकड्या पासून काहीशी सुटका होणार आहे.
राज्यातील काही भागामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णचेच्या लाटेचा व दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा ही देण्यात आलेले आहे. अमरावती, अकोला, धुळे, जळगाव या जिल्ह्यातील नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे, या जिल्ह्यांना हवामान खात्याने उष्णतेचा येलो अलर्ट घोषित केला आहे. तर विदर्भातील अनेक जिल्ह्यात तापमान चाळीस पार केलेले पाहायला मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे मागील काही दिवसांत ४७ अंश सेल्सिअस तापमानची नोंद झाली आहे. हे राज्यातील सर्वाधिक तापमान म्हणून गणले गेले आहे. आणखीन काही जिल्ह्यांमध्ये ही चाळीस पार केलेले पाहायला मिळत आहे असे हवामान खात्याने माहिती दिली आहे.