.
RTE प्रवेश अर्ज भरण्याची लिंक तात्पुरत्या स्वरूपात बंद?
सन २०२४-२०२५ एक शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासवर्ग घटकाकरिता RTE २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही दिनांक १६ एप्रिल २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती तर ३० एप्रिल २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. परंतु त्यानंतर दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी च्या पत्रानुसार दिनांक १० मे २०२४ पर्यंत मुदतवाढ देखील मिळाली होती. परंतु आज या संकेस्थळावर पालकांसाठी एक सूचना दिसत आहे ती अशी की,
RTE २५% अंतर्गत online प्रवेश प्रक्रियेचे (२०२४-२५) अर्ज भरण्याची लिंक तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे.
.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शालेय शिक्षण विभाग सुमारे दहा ते अकरा वर्षांपासून सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी RTE २५% आरक्षित जागांवर प्रवेश दिला जात आहे. परंतु राज्य शासनाने यावर्षी कायद्यात बदल करून केवळ सरकारी शाळांमध्ये RTE अंतर्गत प्राधान्याने प्रवेश देण्याचे धोरण निश्चित केले. सरकारी शाळा उपलब्ध नसतील तरच खाजगी स्वयंम अर्थसहाय्यीत शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल, अशी नियमावली तयार केली. यावर विविध पालक संघटनांनी आवाज उठवला. त्यात काही संघटनांनी न्यायालया पर्यंत देखील धाव घेतली. त्यावर न्यायालयाने शासनाच्या अधीसूचनेल सूचनेला स्थगिती दिली आहे. राज्य शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यातील RTE २५% आरक्षण जागांच्या प्रवेशा संदर्भात विनाअनुदानित शाळांना वगळण्याबाबत काढलेल्या अधीसूचनेला आवाहन देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली गेली होती. न्यायालयात याबाबत सुनावणी घेण्यात आली त्यात राज्य शासनाने ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेला स्थगिती देण्यात आली आहे