Rain पंजाबराव डक यांचा अंदाज! पुढील तिन दिवसात काही भागामध्ये होणार मुसळधार पाऊस?

1000552494 2

Rain पंजाबराव डक यांचा अंदाज! पुढील तिन दिवसात काही भागामध्ये होणार मुसळधार पाऊस?

सध्या उन्हाचा तडाखा जाणवत असताना अधून मधून वातावरणात बदल होत असून अचानक काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो आहे.

हवामान अंदाजक पंजाबराव डक यांनी हवामाना बद्दल महत्वाची माहिती दिली आहे.
हवामान अंदाजक पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये २० एप्रिल पर्यंत अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

या भागामध्ये होणार अवकाळी पाऊस

गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या हवामानामध्ये अचानक बदल होताना दिसत आहे. या अचानक होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्याचे नुकसान होताना पाहायला मिळते आहे.
हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी अशातच एक मोठं विधान केले आहे की २० तारखे पर्यंत अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार आहे. तरी शेतकऱ्यांनी व नागरिकांनी योग्य ति खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे.

मध्य महाराष्ट्र, कोकण व मराठवाडा येथे २० तारखेपर्यंत दाट शक्यता वर्तवली आहे. तसेच पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मराठवाडा विभागात देखील पोषक वातावरण तयार झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच दुसरीकडे पश्चिममहाराष्ट्रातील पुणे सातारा या भागात देखील पावसाची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

याच दरम्यान बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक, जालना, मुंबई, हिंगोली, या भागामध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांना सावध राहण्याचे पंजाबराव डक यांनी केले आहे. तसेच राज्यातील काही भागांमध्ये दिवसा तापमान देखील पूर्वीपेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे. नागरिकांनी उन्हामध्ये घराबाहेर पडू नये असे प्रशासनाच्या वतीने आव्हान करण्यात आलेले आहे.

1693414770721

Leave a Comment