Ration Card – शिधापत्रिका होणार बंद?
आजकाल शिधापत्रिका ही गोरगरिबांची कैवारी मानली जात आहे कारण स्वस्त दरामध्ये धान्य मिळत आहे. हातावरचे पोट असणाऱ्या व मोलमजुरी करणाऱ्या गरीब वर्गाला दोन वेळेस पोटभर अन्न आज या योजनेतून मिळत आहे.
एवढेच नाही तर या शिधापत्रिकेचा वाफर हा सर्वच स्तरातील लोकांना होत आहे.
हा एक प्रकारचा रहिवाशी पुरावा देखील आहे.
आत्ता ही शिधापत्रिका जगाबरोबर डिजिटल होणार आहे. सरकारने या बाबत निर्णय घेतला आहे की शिधापत्रिका ही ई-शिधापत्रिका करण्याचा. लवकरच शिधापत्रिका ही ई-शिधापत्रिका होणार आहे. जुन्या शिधापत्रिकेची छपाई ही सरकारने बंद केली आहे.
या साठी जिल्हातील सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्र या सर्वांना लवकरच या बाबतीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ई-शिधापत्रिका देण्याची कार्यवाही सरकार लवकरच करणार आहे.
ई-शिधापत्रिकेचे अनेक फायदे आहेत त्यामुळे शिधापत्रिका हरवण्याचे किवा खराब होण्याची चिंता नाही. किंवा शिधापत्रिकेचा वापर चुकीच्या पद्धतीने होण्याची श्यकताही कमी होणार आहे.
ई-शिधापत्रिका मिळवण्यासाठी नागरिकांना मोबाईल ॲप डाऊनलोड करून कागदपत्र अपलोड करावी लागणार आहेत किंवा सेतू सुविधा केंद्र किंवा आपले सरकार केंद्र या ठिकाणी जाऊन कागदपत्र अपलोड करावी लागणार आहेत. तर तहसील कार्यालयात कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे.
ज्या नागरिकांकडे शिधापत्रिका आहेत त्यांना ई-शिधापत्रिका करून घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या निर्णयामुळे, गरीब आणि गरजू नागरिकांना धान्य मिळण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल.