Admission Open- RTE प्रवेशा साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया व त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ते पहा?
सन २०२४-२०२५ एक शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासवर्ग घटकाकरिता २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही लवकर सुरू होत आहे तरी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र व ऑनलाईन अर्ज कसा भरावा याबाबत अधिक माहिती पाहूया.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- जन्म दाखला (Student’s Date of Birth Certificate.)
- विद्यार्थी आधार ( Student’s Aadhar Card.)
- रहिवाशी दाखला (Domicile Certificate.)
- उत्पन्न प्रमाणपत्र ( Income Certificate.)
- पासपोर्ट फोटो (Recent Passport Size Photo of the Student.)
- जात प्रमाणपत्र (वडिलांचे) (Parents’ Caste Certificate.)
- वडिलांचे आधार (Parents’ Aadhar Card.)
ही सर्व कागदपत्र आवश्यक आहेत
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जावे
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new
व नंतर Online Application या पर्यायावर जाऊन User Registration करावे. तदनंतर User Login करून मग प्रवेश अर्ज पूर्ण पणे अचूक भरावा व तो सबमिट करावा. जर अर्ज भरण्यास काही अडचण येत असेल तर संकेतस्थळावरील दिलेले युजर मॅन्युअल डाऊनलोड करून त्या पद्धतीने अर्ज भरावा.