🙏 नमस्कार,
खरतर दिवाळी ही मनात असते. आकाश दिवे, 🪔 पणत्या, रांगोळ्या
पक्वान्ने, सजावट ही सगळी आनंदाची बाह्यरूपं आहेत. एकमेकांबद्दल मनातून वाटणाऱ्या भावनांची ती केवळ प्रतिकं असतात. खरी दिवाळी असते ती मनामनात. आपल्या, एकमेकांबद्दल वाटणारा स्नेह, प्रेम, माया, वात्सल्य, आपलेपणा हीच खरी दिवाळी मनामनांची. म्हणूनच ह्या दिवाळीच्या शुभेच्छा मनाकडून – मनाकडे.
समृध्दी यावी सोनपावली,
उधळण व्हावी सौख्याची,
भाग्याचा सर्वोदय व्हावा,
वर्षा व्हावी हर्षाची…
आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता नष्ट होऊन दिवाळीच्या चैतन्यमय प्रकाशात आपले आयुष्य उजळून निघावे. सर्वांना सौख्य, आनंद, निरामय आरोग्य लाभावे तसेच आपल्यावर सदैव लक्ष्मीची कृपा राहावी ही सदिच्छा..!
आपणांस व आपल्या परिवारास संपूर्ण दीपोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा..!
शुभेच्छुक
आपल्या योजना