Solar Eclipse of April 8, 2024 सूर्यग्रहण! 8 एप्रिलला. पहा कुठे दिसणार? दिवसा अंधार होणार?
8 एप्रिल हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. हा दिवस म्हणजे चैत्र महिन्यातील अमावस्या चा दिवस आहे. या दिवशी संपूर्ण सूर्य ग्रहण होईल. हे सूर्यग्रहण म्हणजे तब्बल पन्नास वर्षांनी आलेला योग आहे. या दिवशी काही काळ पूर्ण अंधार होणार आहे याची खबरदारी म्हणून प्रशासनाने पण शाळेला सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.
हे सूर्यग्रहण हे खास असून या दिवशी मात्र काही काळ पूर्ण अंधार होणार आहे. तब्बल सात ते आठ मिनिटे सूर्य दिसणार नाही म्हणजे तितका वेळ पूर्ण काळोख असेल.
सूर्यग्रहण हे अमेरिका आणि काही देशांमध्ये दिसणार असून भारतामध्ये हे दिसणार नाही किंवा त्याचा कसलाच प्रभाव भारतामध्ये नसणार आहे.
या सूर्यग्रहणामध्ये सूर्याच्या डिस्कचे 46 भाग अस्पष्ट होतील. हे ग्रहण मेक्सिको, डुरांगो, कोहुइला, टेक्सास, ओक्लाहोमा, आर्कान्सा, न्यू हॅम्पशायर, यूएस, ओंटारियो, क्यूबेक, न्यू ब्रन्सविक, प्रिन्स एडवर्ड आयलंड, नोव्हा स्कॉशिया, कॅनडा येथे दिसणार आहे. यादिवशी लोक ग्रहण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर पडताना दिसतील.
तज्ज्ञांच्या मते हे सूर्यग्रहण थेट पाहणे टाळण्याचा सल्ला देखील दिलाय. यामुळे डोळ्यांचे नुकसान होऊ शकते आणि डोळे खराब होऊ शकतात.
Solar Eclipse of April 8, 2024
Good